HomeBollywoodजान्हवी कपूरने ओरहानसोबत डेटिंगच्या अफवांवर सोडले मौन, म्हणाली; त्याच्यासोबत मला मजा...

जान्हवी कपूरने ओरहानसोबत डेटिंगच्या अफवांवर सोडले मौन, म्हणाली; त्याच्यासोबत मला मजा…

जान्हवी कपूरने ओरहान अवात्रामणिसोबतच्या डेटिंगच्या अफवांवर मौन सोडले आहे. ओरहानसोबतच्या रिलेशनबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली कि जेव्हा तो माझ्या आसपास असतो तेव्हा मला घरामध्ये असल्यासारखे वाटते. जान्हवीने त्याला तिचा एक चांगला मित्र असल्याचे सांगत म्हंटले कि तो नेहमीच माझ्यासोबत असतो. जान्हवी आणि ओरहान नेहमीच आउटिंग दरम्यान एकत्र पाहायला मिळतात. नुकतेच ओरहान द्वारा आयोजित हॅलोविन पार्टीला जान्हवी कपूरने हजेरी लावली होती.

याआधी देखील दोघांचा दिवाळी साजरी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघांनी अनेक देशांमध्ये एकत्र प्रवास देखील केला आहे. ओरहान देखील जान्हवी कपूरसोबतचे आपले फोटो त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर करत असतो.

तो जान्हवीच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना देखील पाहायला मिळतो. नुकतेच एका मुलाखतीमध्ये जान्हवीने म्हंटले कि मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते आणि तो एक असा व्यक्ती आहे ज्याच्या फक्त मला मजाच येत नाही तर तो माझ्या सोबत अनेक वर्षांपासून आहे.

जेव्हा तो माझ्या आसपास असतो तेव्हा मला घरामध्ये असल्यासारखे वाटते आणि मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला वाटते कि असा मित्र मिळणे खूपच कठीण आहे. जो तुमच्यासाठी नेहमी उभा राहतो, जसे तो आपल्या मित्रांसोबत असतो. तो खूपच चांगला व्यक्ती आहे. जान्हवी नुकतेच मिला चित्रपटामध्ये दिसली आहे, हा चित्रपटा सत्य घटनेवर आधारित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts