कास्टिंग काऊच च्या मुद्यावर अभिनेत्रींनी वेळोवेळी त्यांचे मौन सोडले आहे. याच क्रमात आता अभिनेत्री ईशा कोपीकरनेही खुलासा केला आहे. तिने खुलासा करताना सांगितले कि एका अभिनेत्याने तिला एकटे भेटण्यास बोलावले होते आणि अभिनेत्रीने त्याचा प्रस्ताव नाकारला तेव्हा अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.
ईशा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तथापि, काही ओटीटी प्रोजेक्ट्स मध्ये देखील दिसली आहे. अलीकडेच ईशा ने तिच्या वैयक्तिक जीवन, संघर्ष आणि कास्टिंग काऊच ला घेऊन त्यावर मोकळेपणाने बोलली. ईशा कोपीकर ने एका मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितले कि, ‘हि वर्ष २००० मधील गोष्ट आहे. मला एका नवीन निर्मात्याने बोलावले होते. तो अभिनेत्याच्या संपर्कात होता. मला माहिती नव्हती. त्याच्या सांगण्यावरून मी अभिनेत्यासोबत बोलले.
त्याने मला एकटे भेटायला बोलावले. तेव्हा त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप लागला नव्हता. त्याने मला सोबत कोणत्याही स्टाफ ला आणण्यास मज्जाव केला. मी माझ्या निर्मात्याला फोन केला आणि सांगितले कि मी माझ्या टैलेंटमुळे इथेपर्यंत आलो आहे. मला नंतर त्या चित्रपटातून काढण्यात आले’.
ईशा कोपीकर ने स्वतः ला नॉनसेन्स गर्ल म्हणत, ‘मी एक नॉनसेन्स गर्ल आहे जिला घाबरवणे आणि धमकी दिल्याबद्दल गुंड म्हणून गैरसमज केला जातो आणि याच कारणामुळे काही प्रोजेक्ट्स तिच्या हातून गेले आहेत. मी इथे माझ्या कामामुळे आहे. जर मी तुम्हाला पसंत करत असेन तर मी तुमच्याशी बोलेन, तर मी सर्वांशी बोलेन, जर तुम्ही माझ्यासोबत गोंधळ घातल्यास, तर शुभेच्छा. माझ्या अशा वागण्याने मी अनेक चांगले प्रोजेक्स गमावले आहेत.
ईशा चे लग्न टिमी नारंग सोबत झाले आहे. ईशा कोपीकर चित्रपटांच्या व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील खूप चर्चेत येत असते. ईशा कोपीकर ‘फिजा’, ‘डरना मना है’, ‘कयामत’, ‘दिल का रिश्ता’, ‘पिंजर’, ‘मैने प्यार क्यो किया’, ‘डॉन’, कृष्णा कॉटेज अशा अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
View this post on Instagram