बिजनेस टाइकून आणि रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी ने गुरुवारी राधिका मर्चंट सोबत साखरपुडा केला आहे. या जोडी ने राजस्थान मधील श्रीनाथजी मंदिराचा दौरा केला जिथे त्यांचा ‘रोका’ समारंभ आयोजित केला होता. त्याचे फोटो सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहेत.
ते अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे आधीचे फोटो आहेत. रिलायन्स चे अध्यक्ष मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. अनंत अंबानी चा साखरपुडा त्याची लहानपणीची मैत्रीण राधिका मर्चंट सोबत झाला आहे. लवकरच दोघे विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या आधी अनंत आणि राधिका यांचा ‘रोका’ समारंभ केला गेला. अनंत अंबानी ने यूएसए मधील ब्राऊन युनिव्हर्सिटी मधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये जिओ प्लेट्फोर्म आणि रिलायन्स रिटेल वेंचर्स च्या बोर्ड मध्ये सदस्य च्या रुपात वेगवेगळ्या पदावर काम केले आहे. पुढे भविष्यात तो आरआयएल च्या एनर्जी बिजनेस चे नेतृत्व करत आहे.
राजस्थान च्या नाथद्वारा मध्ये श्रीनाथजी मंदिरामध्ये गेलेल्या अनंत अंबानी चे फोटो समोर आले आहेत. जोडीचा ‘रोका’ समारंभाचा पहिला फोटो ऑनलाईन समोर आला आहे. ‘रोका’ समारंभ राजस्थान मधील राजसमंद जिल्यातील नाथद्वारा स्थित श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला आहे. अनंत आणि राधिका चे लग्न कधी होणार याची अजून माहिती समोर आलेली नाही.
अनंत आणि राधिका खूप आधीपासून एकमेकांना चांगले ओळखतात. राधिका अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिसते. आता लवकरच ती अंबानी परिवारातील लहान सून बनणार आहे. अनंत आणि राधिका यांचा ‘रोका’ झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज चे डायरेक्टर परिमल नाथवाणी ने ट्विट करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. राधिका मर्चंट ने न्युयॉर्क विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. राधिका एनकोर हेल्थकेअर च्या संचालक म्हणून काम करते.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एकमेकांना लहानपणा पासून ओळखतात. वर्ष २०१८ मध्ये त्यांचा फोटो सोशल मिडीयावर वायरल झाला होता. राधिका एक प्रशिक्षित क्लासिकल डान्सर देखील आहे. या वर्षी जून मध्ये अंबानी कुटुंबाने त्यांच्या होणाऱ्या सुनेसाठी अरंगेत्रम समारंभाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त बॉलीवूड मधील प्रसिद्ध कलाकार हजर होते. या कार्यक्रमामधून राधिका चे क्लासिकल डान्स करतानाचे अनेक विडीओ पाहायला मिळाले, ज्याला लोकांनी खूप पसंत केले होते.
Rajasthan | Anant Ambani visited Shrinathji Temple in Nathdwara, Rajasmand district. pic.twitter.com/ZWKGYn1ON0
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 29, 2022
View this post on Instagram
View this post on Instagram