केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या वतीने २०२३ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये एक नवीन घोषणा करत आयकरात सूट जाहीर करण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत, ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट वाढवण्यात आली आहे. म्हणजेच या उत्पन्नापर्यंत कोणालाही कर भरावा लागणार नाही. दरम्यान, १९९२ मधला आयकर स्लॅब सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तेव्हाच्या उत्पन्नावर किती कर भरावा लागला हे पाहायला मिळत आहे.
वास्तविक हा फोटो ट्विटर इंडियन हिस्ट्री पिक नावाच्या हँडलवरून शेयर करण्यात आला आहे. यामध्ये १९९२ च्या अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅब असे कॅप्शन लिहिण्यात आले आहे. २८००१ हजार ते ५०००० रुपयांवर २० टक्के टॅक्स, ५०००१ ते १००००० रुपयांवर ३० टक्के टॅक्स आणि १ लाख रुपयेपेक्षा जास्त इनकमवर ४० टक्के इनकम असे लिहिले आहे.
हा फोटो त्याकाळचा आहे जेव्हा १९९२ मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमधील अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी टॅक्स स्लॅबचे तीन भाग केले होते. हा फोटो व्हायरल होताच यावर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोकांनी याची तुलना आजच्या बजटसोबत केली आहे. एका युजरने लिहिले आहे कि तीस वर्षांमध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळत आहे.
२०२३ मध्ये नवीन घोषणेनुसार अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे की ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. जर ७ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर द्यावा लागणार नाही. तीन ते ६ लाखांपर्यंत तुम्हाला ५ टक्के आणि ६ ते ९ लाखांपर्यंत १० टक्के कर द्यावा लागणार आहे. सध्या नवीन बजट दरम्यान १९९२ मधील हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
1992 :: New Income Tax Slabs In Budget
Up to Rs 28000 – Nil
Rs 28001 to 50000 – 20%
Rs 50001 to Rs 100000 – 30%
Above 1 Lac – 40% Income Tax
( Photo – Indian Express ) pic.twitter.com/nd8h7czxyF
— indianhistorypics (@IndiaHistorypic) February 1, 2023