सोशल मिडियाच्या या काळामध्ये काही काय व्हायरल होईल ते कोणालाही सांगता येत नाही. सश्या चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटामधील सीन लीक होतात. नुकतेच सनी देओल आणि अमिषा पटेलच्या आगामी गदर २ चित्रपटामधील सीन लीक झाला होता.
तर आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतिक्षित टायगर ३ चित्रपटाच्या शुटींग सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि अभिनेता इम्रान हाशमी पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये इम्रान हाशमी आणि सलमान खान पहिल्यांदाच स्क्रीन शेयर करणार आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये इम्रान हाशमीला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
शुटींग सेटवरून लीक झालेल्या व्हिडीओमध्ये इम्रान हाशमी एका खोलीमध्ये पाहायला मिळत आहे ज्यामध्ये सगळीकडे धूर दिसत आहे. व्हिडीओमध्ये इम्रान हाशमीची बॉडी जबरदस्त दिसत आहे. चित्रपटाच्या कथित व्हिडीओमध्ये इम्रानला पाहून लोक अंदाज लावत आहेत कि हा व्हिडीओ फाईट सीन दरम्यानचा आहे. माहितीनुसार चित्रपटामध्ये सलमान खान आणि इम्रान हाशमी दरम्यान जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटासाठी इम्रान हाशमीचीने खूप मेहनत केली आहे. टायगर 3′ चित्रपटाचे दिग्दर्शन महेश शर्मा यांनी केले आहे. यंदाच्या दिवाळीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
सलमान आणि इम्रानच्या चित्रपटामध्ये कॅटरीना कैफ देखील जोयाच्या भुमिकेमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ती सलमान खानसोबत चित्रपटामध्ये दिसणार आहे. कॅटरीना कैफ लग्नाच्या अगोदर चित्रपटाच्या शुटींगचा एक भाग पूर्ण केला होता. सलमान खानचा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगुमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाशिवाय सलमान खान किसी का भाई किसी की जान चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.
#EmraanHashmi Stills From The #Tiger3
Badass Villion Vibee 🔥🔥#SalmanKhan𓃵 #KatrinaKaif pic.twitter.com/8fem1Ui4Hk
— A J A Y S.M. (@BeingAjayJain) February 24, 2023