बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज चित्रपटांपेक्षा सोशल मिडियावर जास्त सक्रीय राहते. अभिनेत्री सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. इलियाना डिक्रूजने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. या बातमी नंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला पण ती लग्न न करताच प्रेग्नंट झाल्यामुळे तिच्यावर प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. तथापि याचा अभिनेत्रीवर काहीच परिणाम झाला नाही आणि ती सध्या तिची प्रेग्नंसी इंजॉय करत आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरवरून एक नवीन व्हिडीओ शेयर केला आहे.
नुकतेच शेयर केलेला हा व्हिडीओ फेमस रॅपर बादशाह आणि इलियानाच्या ‘सब गजब’ गाण्याचा आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री अप्रतिम डांस करताना दिसत आहे. काही सेकंदांच्या या क्लिपमध्ये इलियानाच्या डांस मूव्हवर चाहते फिदा झाले आहेत. व्हिडीओला कॅप्शन देत इलियानाने लिहिले आहे की, पुन्हा एकदा कारण आजकाल सर्वकाही आश्चर्यकारक आहे.
इलियानाच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की अभिनेत्री ट्रोलच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. शिवाय इंस्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर करून अभिनेत्रीने सध्या तिची प्रकृती कशी आहे हे देखील सांगितले आहे. इलियानाने स्टोरीमध्ये एक मिम शेयर केला आहे, ज्यामध्ये एक मांजर दिसत आहे. फोटोमध्ये मांजरीचे पोट पूर्णपणे भरलेले दिसत आहे. यावर लिहिले आहे कि जेव्हा चार कोर्स मिल खाल्ल्यानंतर जेव्हा कोणी केक खायला सांगत असेल तर पहा कसे हाल होते.
मीमला कॅप्शन देताना इलियानाने लिहिले आहे की, कुटुंबासोबत डिनर करताना असे फील होते. अभिनेत्रीच्या या पोस्टवर हे स्पष्ट होते कि तिचे कुटुंब सध्या तिला खूप खाऊपिऊ घालत आहे. यासोबतच आणखी एक फोटो शेयर करत इलियानाने सांगितले आहे कि प्रेग्नंसी दरम्यान तिला केक खाण्याची खूप इच्छा होत आहे.
View this post on Instagram