HomeBollywoodइलियाना डिक्रूझने उघड केली तिची विचित्र सवय, म्हणाली; ‘मला रोज रात्री...’

इलियाना डिक्रूझने उघड केली तिची विचित्र सवय, म्हणाली; ‘मला रोज रात्री…’

बॉलीवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूझ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने दर्शकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्रीने नुकतेच आपला वाढदिवस साजरा केला आहे. तिचा जन्म १९८७ मध्ये मुंबईमध्ये झाला होता.

लहान वयामध्येच अभिनेत्रीमध्ये चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने वयाच्या १९ व्या वर्षी आपला मोर्चा साउथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळवला. साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील इलियानाने अमाप प्रसिद्धी मिळवली.

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिचा देवासु हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी तिला साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. मिळाला होता. यानंतर तिने साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. पोकीरी, किक, जुलै सारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये यश मिळवल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली. बॉलीवूडमध्ये तिने बर्फी चित्रपटामधून डेब्यू केला होता. यानंतर ती मैं तेरा हीरो, रेड, रुस्तम आणि बादशाहो चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळाली होती. अभिषेक बच्चनसोबत ती द बिग बुल चित्रपटामध्ये देखील दिसली होती.

अभिनेत्री सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. सोशल मिडियावर तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. काही वर्षांपूर्वी तिने आपल्या एका विचित्र सवयीबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली होती कि ती झोपेमध्ये चालण्याची सवय आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले होते कि जर ती रात्री झोपेमध्ये चालली नाही तर सकाळी तिच्या पायाला सूज येते. तिच्या या चकित करणाऱ्या खुलास्यानंतर चाहते देखील थक्क झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts