HomeViralIAS अधिकाऱ्याने शेयर केले जुन्या नाण्यांचे फोटो, विचारले; ‘याने तुम्ही काय काय...

IAS अधिकाऱ्याने शेयर केले जुन्या नाण्यांचे फोटो, विचारले; ‘याने तुम्ही काय काय खरेदी केले आहे…? लोकांनी दिली अशी उत्तरे…

एक काल असा होता जेव्हा लोक कौडी आणि कौडी सारखे चलन वापरत असत. हळूहळू चलनात बदल होत गेला आणि एक आणे किंवा दोन आणे वापरात आले. नंतर २५ पैसे, ५० पैसे देखील चलनात आले. जास्त लांब नाही, काही वर्षांपूर्वी १००० रुपयांची नोट देखील चलनात होती. अशाप्रकारे नाणी आणि नोटांचे चलन सुरु होणे किंवा संपवणे हे सामान्य झाले आहे. लोक जेव्हा त्या मुद्रांशी जोडलेले अनुभव आणि आठवणी ऐकवतात तर खूप अविस्मरणीय वाटते. अलीकडेच एका आईएएस अधिकाऱ्याने लोकांना अशाच काही अनुभवाबद्दल विचारले.

आईएएस अधिकारी अवनीश शरण कायम त्यांच्या ट्विटर वर अनेकदा आश्चर्यचकित करणाऱ्या पोस्ट टाकत असतात. अलीकडे त्यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये लोकांना त्यांच्या जुन्या अनुभवाबद्दल विचारण्यात येत होते. या फोटो मध्ये अनेक जुन्या काळातील नाणी लावलेली दिसत आहेत. अवनीश ने लोकांच्या कडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि ते या नाण्यांना कसे आठवणीत ठेवतात. त्यांनी फोटो सोबत लिहिले आहे कि – ‘यामधील कोणत्या नाण्याने तुम्ही काही खरेदी केले आहे काय?’.

फोटो मध्ये २ पैसे, ३ पैसे,५ पैसे,१० पैसे आणि २५ पैसे आणि ५० पैसे यांची देखील नाणी आहेत. आजच्या काळामध्ये या नाण्यांचे काही महत्व नाही, पण एक काळ होता तेव्हा हे देखील मौल्यवान होते. अवनीश च्या या पोस्ट ला पाहून हजारो लोकांनी त्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ३ हजार पेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तर ११ हजार पेक्षा जास्त लोकांनी या फोटो ला लाईक देखील केले आहे.

एका व्यक्तीने लिहिले आहे कि – “यापैकी एक गायब आहे ज्यातून आम्ही आमच्या गावामध्ये लिंबू घ्यायचो, पाचनयकी मध्ये पाच लिंबू”. तर आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे – “लहानपणी आम्ही एक पैश्याच्या नाण्याने शाईची गोळी खरेदी केली आहे”. एकाने लिहिले आहे कि – “सर्व पैशांना पाहिले आहे, वापरले देखील आहेत. या पैशांनी खरेदी करून जे खाल्ले आहे आज मोठी नोट देखील तो आनंद देऊ शकत नाही”. काही लोकांनी तर जुन्या नाण्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत जे त्यांनी अजूनही सांभाळून ठेवले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts