सोशल मिडियावर ऋतिक रोशनचा एक बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आपल्या बालपणीच्या क्लाससोबत फोटोमध्ये पोज देत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही थर्ड रोमध्ये जो तिसरा चेहरा दिसत आहे तो ऋतिक रोशन आहे.
पण या क्लास फोटोमध्ये आणखी एक असा व्यक्ती आहे ज्याला तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहता. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ऋतिक रोशनसोबत जॉन अब्राहम देखील आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे जॉन अब्राहम आणि ऋतिक रोशन एकमेकांचे क्लासमेट होते. बालपणी जॉन आणि ऋतिक एकमेकांसोबत खूप मस्ती करत होते.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही जॉन अब्राहमचा चेहरा ओळखू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तो कुठे उभा आहे. सेकंड रो च्या लेफ्ट साइडमध्ये दिसत असलेला पहिला मुलगा जॉन अब्राहम आहे. ऋतिक रोशन आणि जॉन अब्राहमने आपल्या शाळेतील शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून घेतले आहे. या कलाकारांचा बालपणीचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना त्याला ओळखणे खूपच कठीण काम झाले आहे.
कोणाला माहिती होते कि एकाच क्लासमध्ये हे दोघे शिकणारे बॉलीवूडमध्ये डंका वाजवतील. हे दोन्ही कलाकार लाखो मुलींच्या हृदयाची धडकन आहेत. लाखो मुली त्यांच्यावर फिदा आहेत. सध्या ऋतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आजादसोबतच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे जॉन अब्राहम त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणमुळे चर्चेमध्ये आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामध्ये जॉन अब्राहमने रॉ ऑफिसर जिमची भूमिका केली आहे. जॉन अब्राहमची हि भूमिका दर्शकांना खूपच पसंद येत आहे.
@iHrithik‘s school album. Spot little #HrithikRoshan here. Tell us in comments. Sunday made ❤#Hrithik #bollywood pic.twitter.com/nxu67Olc6l
— Hrithik Inspires (@HrithikInspires) November 18, 2018