शरीराच्या काही संवेदनशील भागांबद्दल बोलायचे झाले तर कान हा त्यातील एक प्रमुख भाग आहे. कधी कधी कानामध्ये कोणती अशी गोष्ट जाते ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. कधी असेही होते कि त्यामुळे खूप नुकसान देखील होते, त्यामुळे कानाची काळजी योग्यप्रकारे घेणे गरजेचे आहे. अलीकडे कानाशी संबंधित एक असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एका मुलाच्या कानामध्ये अचानक एक कोष्टी घुसला. नंतर मुलाने काही असे केले ज्यामुळे तो कोष्टी जिवंत योग्यप्रकारे बाहेर निघून आला.
प्रत्यक्षात, याचा एक व्हिडीओ एका युजर ने ट्विटर वर शेअर केला आहे. व्हिडीओ मध्ये दिसत आहे कि एक व्यक्ती कान वर करून झोपला आहे. असे वाटत आहे कि त्याच्या कानामध्ये खूप दुखत आहे. त्यानंतर समोरून एक व्यक्ती इंजेक्शन असणारा डिस्पोजलमध्ये पाणी भरून कानामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने तीन चार थेंब कानामध्ये टाकल्यानंतर, तो कोष्टी लगेचच कानामध्ये वर येऊ लागला.
त्यानंतर थोड्या वेळाने तो कोष्टी कानाच्या बाहेर येऊन गळयाजवळ येऊन पोहोचला. चकित करणारी गोष्ट हि होती कि तो कोष्टी जिवंत कानामधून बाहेर आला. याचा अर्थ असा होतो कि त्याने कानाला जास्त इजा पोहोचवली नाही. जसे तो कोष्टी बाहेर आला. त्या व्यक्तीने कानामध्ये पाणी घालणे बंद केले आणि उठून उभा राहिला.
हा व्हिडीओ सोशल मिडीयावर जसा समोर आला, लोकांना यातून एक गोष्ट शिकायला मिळाली. एक युजर ने लिहिले कि, जर कानामध्ये कोणती जिवंत वस्तू गेली तर त्याला पाणी टाकून आहे तसे बाहेर काढता येते. तर दुसऱ्या एका युजर ने लिहिले कि हा एक फक्त योगायोग आहे. प्रत्येक वेळी असे होऊ शकत नाही आणि असे देखील होऊ शकत नाही कि प्रत्येकवेळी कानामध्ये पाणी घालून बाहेर निघेल. यावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Look at what comes out of this guys ear 😳 pic.twitter.com/PKtRv5Fxyx
— OddIy Terrifying (@OTerrifying) March 2, 2023