HomeViralफॅक्ट्रिमध्ये असे बनते नुडल्स, व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील बसेल धक्का, नुडल्स खायचा...

फॅक्ट्रिमध्ये असे बनते नुडल्स, व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील बसेल धक्का, नुडल्स खायचा देखील कधी विचार करणार नाही…

सध्याची तरुण पिढीला चायनीज फूडचं खूप वेड आहे. रस्त्याच्या बाजूला लागलेल्या स्टॉल्सवर तुम्हाला बहुतेक वेळा तरुण पिढीच चायनीज फूडचा आनंद घेताना पाह्यला मिळेल. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि हे नुडल्स कसे बनतात. वास्तविक सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही नुडल्स खाण्याचा कधी विचार देखील करणार नाही.

हा व्हिडीओ पीएफसी क्लबचे संस्थापक चिराग बड़जात्याने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि किती घाणेरड्या प्रकारे नुडल्स बनवले जात आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओ वरून असे दिसून येत आहे कि हा व्हिडीओ नुडल्सच्या एखाद्या छोट्या फॅक्ट्रिमध्ये शूट केला गेला आहे. यामध्ये विविध मजूर नुडल्स तयार करताना पाहायला मिळत आहेत. हे लोक पीठ मळण्यासाठी मिक्सरमध्ये टाकतात. यानंतर त्याला रोलिंग मशीनद्वारे पातळ धाग्यांमध्ये कट केले जाते.

यादरम्यान कोणताही मजूर साफसफाईकडे लक्ष देत नाही आणि किंवा हातामध्ये ग्लोव्हज घालत नाही. नुडल्स पाण्यामध्ये उकळल्यानंतर ते जमिनीवर फेकले जातात. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक होईपर्यंत ते असेच राहतात. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, तुम्ही रस्त्याच्या कडेला शेझवान सॉससोबत चायनीज हक्का नूडल्स कधी खाल्ले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. लोकांनी कमेंट्समध्ये खूपच घाणेरडे लिहिले आहे. एका युजरने म्हंटले आहे कि, यापेक्षा सर्वात घाणेरडी प्रक्रिया कोणतीच असू शकत नाही. जर हे फॅक्ट्रिमध्ये सुरु आहे तर ते बंद का केले जात नाही. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि जर तुम्ही एखादे प्रोडक्ट घेता आणि तो एखाद्या मोठ्या ब्रँडचा नसेल तर ते बनवण्याची पद्धत अशीच असेल. सँडविच, शेवपुरी आणि पाणीपुरी बनवण्याची प्रक्रिया देखील सारखीच असेल. रस्त्याच्या कडेला असलेले सँडविच बटर कसे बनवले जाते याचा कधी विचार केला आहे का?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts