कोलकाता मधील एक जोडपे मध्य प्रदेश च्या इंदौर मधील एका हॉटेल च्या खोलीमध्ये थांबले होते, जिथे त्यांच्या सोबत काही लज्जास्पद घडले. महिला हॉटेल च्या रूम मध्ये तयार होत होती, तेव्हा तिला असे काही दिसले, ज्यामुळे तिला आश्चर्याचा धक्काच बसला, हे प्रकरण इंदौर च्या सोलारीस हॉटेल मधील आहे, जे भंवर कूआं पोलीस स्टेशन च्या हद्दीत येते.
या हॉटेल मध्ये कोलकाता चे राहणारे नवरा बायको थांबले होते. कामानिमित्त नवरा बाहेर गेला होता. त्यावेळी महिला खोली मध्ये तयार होत होती. तेव्हा महिलेला पडद्याच्या मागे काही हालचाल दिसून आली. प्रत्यक्षात हॉटेल मधील स्वच्छता कर्मचारी असणारे तीन तरुण पडद्याच्या मागे लपून त्या महिलेला पहात होते. जसे त्या महिलेने त्या तरुणांना पाहिले, ती खूपच घाबरून गेली होती. ते तरुण तिला तयार होताना पहात होते.
तिन्ही तरुणांचे हे घाणेरडे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. महिलेने त्याची तक्रार केल्यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले, ज्यामध्ये त्या तिन्ही तरुणांचे हे गैर कृत्य दिसले. महिलेने भंवर कूआं पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. माहिती नुसार, पोलिसांनी त्यांना विविध कलमांतर्गत त्यांच्या वर गुन्हा नोंदवून त्याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश च्या नोएडा मधील हॉटेल च्या रूम मधील रेकॉर्डिंग प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्षात हे लोक हॉटेल मध्ये राहणाऱ्यांचे विडीओ बनवत असत आणि नंतर त्यांना ब्लैकमेल करत असत. त्यासाठी त्यांनी खूपच चतुराईने खेळ खेळला. त्यांनी पहिला एक ओयो हॉटेल मधील रूम बुक केली. नंतर त्यांनी रूम मध्ये कॅमेरा अशा प्रकारे लपवला कि सफाई कर्मचाऱ्यांना याच्या बद्दल कोणतीही माहिती समजणार नाही.
हॉटेल मधील खोलीच्या सजावटीच्या वस्तूंमध्ये अनेकदा अशा प्रकारचे कॅमेरे लपवलेले असतात. जसे अलार्म घड्याळ, स्पीकर आणखी कोणत्या वस्तूंमध्ये आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये. म्हणूनच खोलीमध्ये अशाप्रकारच्या वस्तू काळजीपूर्वक तपासल्या पाहिजेत. त्याव्यतिरिक्त सेटटोप बॉक्स आणि टीवी देखील तपासले पाहिजेत. बाथरूम मधील शॉवर, हेअर ड्रायर, पावर सॉकेट मध्ये देखील गुप्त कॅमेरा लपवता येतो. तपासण्यासाठी रूम मधील सगळ्या लाईटस बंद करा. नाईट व्हिजन कॅमेरा मधून रात्री सामान्य उजेड येत असतो.