दयाळूपणा हा माणसामधील एक असामान्य गुण आहे. हाच माणसाला जगामध्ये राहण्यसाठी चांगले बनवतो. आज आपण अशी एक स्टोरी जाणून घेणार आहोत ज्यानंतर तुम्ही देखील त्या व्यक्तीचे कौतुक कराल. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि एक सेल्समन आणि काही बेघर मुले दिसत आहेत. मुले एका शोरूमच्या बाहेर बसून टीव्ही बघत आहेत. तेव्हा तो सेल्समन बाहेर येतो आणि त्या मुलांना विचारतो कि तुम्हाला स्टोरच्या आतमध्ये बसून टीव्ही बघायची आहे का, हा व्हिडीओ तुम्हाला देखील अवश्य बघायला हवा.
हा व्हिडीओ एका गौतम त्रिवेदी नावाच्या युजरने ट्विटर अकाऊंट वरून शेयर केला आहे. १८ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक सेल्समनला तुम्ही शोरूमच्या मध्ये टीव्ही चॅनल बदलताना पाहू शकता. जिथे दोन बेघर मुले देखील पाहायला मिळत आहेत आणि त्याने त्यांना हे निवडू दिले कि टीव्हीवर काय पहायचे आहे.
व्हिडीओ शेयर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि स्टोर इंचार्ज आला आणि त्याने रस्त्यावरील बेघर मुलांना विचारले कि टीव्हीवर त्यांना काय पहायचे आहे. व्हिडीओने सध्या सोशल मिडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मिडिया युजर्स सेल्समनच्या या वर्तणूकीचे कौतुक करत आहेत.
एका युजरने लिहिले आहे कि हा व्हिडीओ माझ्या टाइमलाइनवर आणण्यासाठी धन्यवाद. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि इतके सुंदर आणि दयाळू भाव आहेत ज्याची वास्तवामध्ये खरच किंमत करता येत नाही.
Store incharge let’s homeless street kids choose what to watch on the display TV every evening. pic.twitter.com/ElOPGL61Fb
— Gautam Trivedi (@KaptanHindustan) January 5, 2023