HomeViralभारतासाठी मेडल जिंकणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूवर आलेय इतकी वाईट वेळ, रोजच्या गरजा भागवण्यासाठी...

भारतासाठी मेडल जिंकणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूवर आलेय इतकी वाईट वेळ, रोजच्या गरजा भागवण्यासाठी करतोय हमाली…

बहुतेक भारतीयांसाठी खेळ म्हणजे फक्त क्रिकेट आहे. क्रिकेटशिवाय असे अनेक खेळ आहेत ज्यात खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र असे एक प्रकरण समोर आले आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. राज्यस्तरीय पंजाबी हॉकी खेळाडू परमजीत कुमारने एकदा राज्य स्तरावर पंजाचे नावलौकिक केले होते.

तो फक्त भारतीय क्रीडा प्राधिकरण पीईपीएसयू आणि टीम पंजाबचा हिस्सा होता. त्याने ज्युनिअर हॉकी नॅशनलमध्ये पदकेही जिंकली होती. २००७ मध्ये भारतीय ज्युनियर हॉकीचा टीमचा तो भाग होता. तथापि आज तो फरीदकोट मंडीमध्ये हमाल म्हणून एका दिवसाच्या शिफ्टमध्ये पोती भरण्याचे आणि उतरवण्याचे काम करतो.

माहितीनुसार माजी हॉकीपटू परमजीतला प्रत्येक पोत्यामागे १.२५ रुपये मिळतात आणि तो दिवसाला ४५० पोटी उचलण्याचे काम करतो. राज्य स्तरीय हॉकी खेळाडूची हि दुर्दशा पाहून सोशल मिडिया युजर्सचे मन हेलावून गेले आहे. सोशल मिडिया युजर्सनी सरकारला परमजीत कुमारला मदत करण्याची विनंती केली आहे.

इतर लोक खेळाडूची मदत करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे आले आहेत आणि अशा स्थितीबद्दल त्यांनी निराशा देखील व्यक्त केली आहे. एका ट्विटर यूजरने लिहिले आहे कि जिवंत राहण्यासाठी त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मी त्याला सलाम करतो. भलेही सरकार किंवा क्रीडा परिषदने त्याच्या मूल्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि राष्ट्रीय क्रीडापटूची दुर्दशा पाहून लाज वाटली, पण हे आश्चर्यकारक नाही. तर आणखी एका युजरने ट्वीटमध्ये लिहिले आहे कि हेच कारण आहे आईवडील आपल्या मुलांना खेळाला आपले करियर निवडण्यास प्रोत्साहन देत नाहीत.

मिडियासोबत बोलताना परमजीत कुमारने म्हंटले कि त्याच्या कामाबद्ल बहुतेक लोकांना माहिती नाही, पण जेव्हा लोकांना समजते तेव्हा लोक त्याची पाठ थोपटतात. हॉकी खेळाडूने म्हंटले कि खेळातून त्याला फक्त हेच बक्षीस मिळाले आहे. परमजीत फरीदकोटमध्ये लहानाचा मोठा झाला होता आणि सरकारी बिजेंद्र कॉलेजमध्ये त्याने कोच बलतेज इंदपाल सिंह बब्बू यांच्याकडून हॉकी शिकली होती. परमजीतची २००४ मध्ये NIS, पटियाला येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI) प्रशिक्षण केंद्रासाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर २००७ मध्ये त्यांची एनआयएस, पटियाला येथे हॉकीसाठी सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी निवड झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts