HomeViralफोटोमधील प्राणी तुमच्याकडे रागाने पाहत आहे, ९९% लोक शोधण्यात झाले आहेत फेल,...

फोटोमधील प्राणी तुमच्याकडे रागाने पाहत आहे, ९९% लोक शोधण्यात झाले आहेत फेल, तुम्हाला दिसला का ?

दररोज आपल्याला कोणताना कोणता ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो पाहायला मिळत असतो. जो पाहिल्यानंतर कोणाचेही डोके चक्रावून जाईल. कारण असे फोटो लोकांना फक्त भ्रमितच करत नाहीत तर त्यामधील कोडे सोडवण्यासाठी चॅलेंज देखील करतात.

अशी अनेक कोडी आहेत जी सहजपणे सोडवली जाऊ शकत नाहीत. पण काही तुम्हाला भ्रमित करतात. अनेकवेळा प्रयत्न करून देखील तुम्ही अशी कोडी सोडवू शकत नाही. नुकतेच न्युझीलंडच्या सायन्स टीचर आणि नॅनोटेक्नोलॉजिस्ट डॉ. मिशेल डिकिंसन द्वारे शेयर केलेला असाच एक फोटो समोर आला आहे. हा फोटो अनेक लोकांना आपले डोके खाजवण्यास भाग पाडत आहे.

जे लोक ऑप्टिकल इल्यूजनमध्ये लपलेल्या रहस्यांना शोधण्यात स्वतःला एक्सपर्ट समजतात त्यांना डॉ. डिकिंसनद्वारे ट्विटरवर शेयर केलेल्या फोटोमधून प्राणी शोधून काढण्यात एकदा तरी प्रयत्न करायला हवेत. डिकिंसनने काळ्या आणि पांढऱ्या रेषांचा एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो शेयर केला आहे.

तुम्हाला रेषांमध्ये एखादा प्राणी दिसला का ?

चॅलेंज हे आहे कि या फोटोमधून एक लपलेला प्राणी शोधून काढायचा आहे. इथे एक ट्विस्ट आहे. अनेक प्रयत्न करून देखील तुम्ही उघड्या डोळ्यांनी त्यामधील प्राणी शोधून काढू शकणार नाही.

प्राणी शोधून काढण्यासाठी वापरावी लागले एक ट्रिक

फोटोमध्ये लपलेला प्राणी शोधून काढण्यासाठी तुम्हाला अर्धे डोळे बंद करावे लागतील. डिम लाईट देखील प्राणी शोधून करण्यासाठी तुमची मदत करू शकते. सुरुवातीला तुम्ही शोधून काढू शकत नाही कि फोटोमध्ये कोणता प्राणी लपला आहे. पण जेव्हा तुम्ही नोटीस करू शकाल. तेव्हा हे खूपच सोपे होईल. सर्वात सोपा मार्ग हा आहे कि तुम्ही तुमचे डोके थोडे हलवून पहा. या इल्यूजनमधील प्राणी तुम्हाला दिसू लागेल. पांढऱ्या आणि काळ्या रेषांमध्ये एक मांजर लपली आहे.

जर तुम्ही फोटोवर लक्ष केन्द्री केले तर तुम्हाला फोटोमध्ये लपलेली मांजर सहज दिसून येईल. काय झालात ना हैराण ? मग शेयर करा तुमच्या मित्रांसोबत आणि त्यांना देखील शोधून दाखवायला सांगा या फोटोमधील प्राणी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts