HomeViralज्या बहिणीचा बालविवाह केला तिच बहिण पोलीस ऑफिसर बनून आली गावात, मग...

ज्या बहिणीचा बालविवाह केला तिच बहिण पोलीस ऑफिसर बनून आली गावात, मग भावांनी केले तिचे असे स्वागत, तुम्ही देखील कौतुक कराल….

हेमलता चौधरी उर्फ हेमाकक्षी या मुलीची स्टोरी सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. भारत पाकिस्तान बॉर्डरवर बाड़मेर जिल्ह्याच्या सरणू चिमनजीच्या छोट्या ढाणीची राहणारी आहे. हेमलताने राजस्थान पोलीसमध्ये उप निरीक्षक बनण्यात यश मिळवले आहे.

एसआई बनल्यानंतर हेमलता चौधरी खाकी वर्दीमध्ये पहिल्यांदा जेव्हा आपल्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या आईवडिलांचे डोळे भरून आले. नातेवाईकांचा डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहू लागले. हि तिच हेमलता होती जिचे १० वी मध्ये शिकत असताना लग्न लावून देण्यात आले होते. १२ वी मध्ये जाता जाता ती एका मुलाची आई बनली होती.

हेमलताचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गाव सरणू चिमनजी आले होते. मुलगी हेमलताच्या स्वागत करताना महिलांनी मंगल गीत गायले. भवानी तिला आपल्या खांद्यावर बसवून संपूर्ण गावामध्ये फिरवले. शेतकरी वडील दुर्गारामने एसआई मुलीच्या डोक्यावर फेटा बांधला, तर आईने मुलीला मिठी मारली.
मिडियासोबत बोलताना हेमलता चौधरीने सांगितले कि बारावीमध्ये पास झाल्यानंतर तिने अंगणवाडीमध्ये अस्थायी नौकरी आणि स्वयंपाठी म्हणून शिक्षण घेतले. अंगणवाडीमध्ये दहा वर्षे सेवा केली. यादरम्यान देखील तिने आपले शिक्षण सुरु ठेवेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आठवीनंतर शिक्षणासाठी दररोज घरापासून शाळेपर्यंत जवळ जळव १४ किलोमीटर दूर जावे लागायचे.
वडील दुर्गारामने सांगितले कि हेमलताने लग्नानंतर स्वरयंपाठी विद्यार्थी म्हणून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. प्रत्येकजण तिला शिक्षक बनण्याचा सल्ला देत होते पण तिला पोलिसमध्ये जायचे होते. तिने २०१५ मध्ये पोलीस कॉन्स्टेबलची दिली ज्यामध्ये ती लेखी परीक्षेमध्ये पास झाली. पण शारीरिक क्षमतेमध्ये तिला यश मिळाले नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये असफल झाल्यानंतर तिने हिंमत सोडली नाही.
हेमलताने २०१६ मध्ये पुन्हा एकदा राजस्थान पोलीस उप निरीक्षक परीक्षेमध्ये आपले नशीब अजमावले. यावेळी तिला यश मिळाले. २०२१ मध्ये हेमलता उप निरीक्षक बनली होती. आता पासिंग आउट परेडनंतर पहिल्यांदा जेव्हा ती घरी आली तेव्हा सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
हेमलता चौधरी उर्फ हेमलता जाखड़ने सांगितले कि ती गावातील पहिली महिला सब इंस्पेरक्टमर आहे. लहापणापासून तिचे पोलिसात जाण्याचे स्वप्न होते जे तिने पूर्ण केले. यादरम्यान तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, पण हिंमत कधी हारली नाही.
उप निरीक्षक हेमलता चौधरीचे वडील दुर्गाराम जाखड़ म्हणतात कि मुलीला शिकवताना लोकांनी खूप टोमणे मारले होते पण आता मुलगी राजस्थानन पोलिसात उप निरीक्षक बनली तर लोक तिचे कौतुक करतात. संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुलीने तरुण पिढीला शिकून मोठे होण्याची प्रेरणा दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts