साऊथ स्टार्सचे चाहते सध्या राम चरण आणि उपासना आई-वडील होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण साऊथच्या अनेक स्टार्सच्या घरी देखील नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. पूजा रामचंद्रन आणि जॉन कोननन देखील आपल्या बाळाची वाट पाहत आहेत. यादरम्यान साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री हर्षिका पूनाचाचे काही फोटो समोर आले आहेत, जे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
हर्षिका पूनाचा कन्नड़ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि सध्या ती आपल्या चित्रपटामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री हिरव्या रंगाच्या साडीमध्ये आणि केसरी रंगाच्या ब्लाऊजमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सुंदर ज्वेलरी आणि हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातलेली पाहायला मिळत आहे आणि माथ्यावर केसर लावले आहे. तिने सुंदर बिंदी देखील घातली आहे.
अभिनेत्री या फोटोमध्ये बेबी शॉवरची विधी करताना दिसत आहे. तिच्या आसपास अनेक महिला देखील दिसत आहेत. अभिनेत्रीने गळ्यामध्ये गोल्ड ज्वेलरीशिवाय माळ देखील घातली आहे आणि केसांमध्ये चमेलीच्या फुलांचा गजरा देखील घातला आहे.
चोकर नेकलेस हर्षिका पूनाजाच्या लुकची आणखीनच शोभा वाढवत आहे आणि फोटोमध्ये ती खूपच खुश दिसत आहे. सध्या हे फोटो पाहून चाहते असा अंदाज लावत आहेत कि तिने लग्न केले आहे. तर असे काही नाही वास्तविक हर्षिकाचे हे फोटो कसीना सारा चित्रपटामधील सीमांथा गाण्याच्या शुटींग सेटवरचे आहेत जे अभिनेत्रीने शेयर केले आहेत.
हर्षिका द्वारे शेयर केलेल्या फोटोंवर युजर्सने हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि तू इतक्या लवकरच लग्न केले..तर काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काही नेटिज़न्सने विचारले कि तू कोणासोबत लग्न केले.
View this post on Instagram