HomeEntertainmentलंडनच्या भर रस्त्यामध्येच ‘राणादा’ ‘पाठकबाईं’मध्ये जुंपली, जबरदस्त भांडणाचा व्हिडीओ झाला व्हायरल...

लंडनच्या भर रस्त्यामध्येच ‘राणादा’ ‘पाठकबाईं’मध्ये जुंपली, जबरदस्त भांडणाचा व्हिडीओ झाला व्हायरल…

तुझ्यात जीव रंगला मालिका प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमधून राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी नुकताच आपल्या साखरपुडा उरकला आहे. दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय जोडीने अक्षय तृतीय दिवशी अचानक साखरपुडा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता लग्नाच्या अगोदर दोघे लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

पण दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडिया व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दोघांमध्ये तुंबळ भांडण होताना पाहायला मिळत आहे. लंडनच्या रस्त्यावरच दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सध्या अक्षया आणि हार्दिक हे एकमेकांना निवांत वेळ देत आहेत.

नुकतेच अभिनेत्री अक्षया देवधरने एक मजेशीर व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे ज्यामध्ये ती हार्दिकची कॉलर पकडलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये हार्दिक अभिनेता नितीश चव्हाणला म्हणतो कि, हे बघ मित्रा पितळेला घासल्याने त्याचे सोने कधीच बनत नाही.

यावर नितीश म्हणतो कि तू असं का म्हणत आहेस ? यावर हार्दिक म्हणतो कि माझी बायको पार्लरमध्ये गेली आहे. हार्दिक असे म्हंटल्याचे ऐकताच अक्षया चांगलीच भडकते. त्यानंतर ती नितीशकडे रागाने बघून चक्क हार्दिकची कॉलरच पकडते.

हा व्हिडीओ शेयर करत तिने कॅप्शनमध्ये हिंम्मतवाला असे देखील लिहिले आहे. अक्षयाने शेयर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अल्पावधीतच व्हिडीओवर लाखो व्हिव आणि कमेंट आल्या आहेत. एकाने तर चक्क “अंजलीबाईनी हाणलं दोघांना पण” अशी देखील कमेंट केली आहे.

अक्षया आणि हार्दिकने त्यांचा साखरपुडा अचानक उरकून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. याचे फोटो शेयर करत अक्षयाने ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन देखील दिले होते. यामध्ये तिने दोघांच्या नावाची सुरुवातीची अक्षरे वापरला आहे. राणादा म्हणजेच हार्दिकने देखील आपले साखरपुड्याचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitish Chavan (@nitish__chavan)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts