HomeBollywoodमित्राच्या पहिल्या लग्नामध्ये पोटभरून जेवली होती ‘हि’ अभिनेत्री, आता त्याच्यासोबतच करतेय लग्न...

मित्राच्या पहिल्या लग्नामध्ये पोटभरून जेवली होती ‘हि’ अभिनेत्री, आता त्याच्यासोबतच करतेय लग्न…

हंसिका आपला संसार थाटण्यासाठी तयार झाली आहे. तथापि अजूनपर्यंत तिच्या लग्नाची तारीख पक्की झालेली नाही. यादरम्यान हंसिकाच्या एका व्हायरल फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या होणार्या पतीच्या पहिल्या लग्नामध्ये पोज देतानाचा हंसिकाचा फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.

साउथची फेमस अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नाच्या बंधनामध्ये अडकणार आहे. हंसिकाने फोटो पोस्ट करून आपले प्रेम जगजाहीर केले होते आणि सांगितले होते कि तिचा होणारा पती सोहल कथुरियाने तिला कसे पॅरिसमध्ये प्रपोज केले. हंसिकाच्या शेयर केलेल्या या फोटोसोबत तिचा आणखीन एक फोटो व्हायरल होत आहे. जिथे हंसिका आपल्या होणाऱ्या पतीच्या पहिल्या लग्नामध्ये स्माईल देताना दिसत आहे.

लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेमध्ये आलेली हंसिका सध्या क्लाउड नाईनवर आहे. सोहेलचे हे दुसरे लग्न आहे. याआधी त्याने रिंकी बजाजसोबत सात फेरे घेतले आहेत. या लग्नामध्ये हंसिका देखील सामील झाली होती. फोटोमध्ये हंसिका रिंकीसोबत पोज देताना दिसत आहे. पण सध्या हंसिकाच्या प्रेमात पडलेल्या सोहेलने तिच्यासोबत लग्न करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळेच त्याने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर तिला प्रपोज केले.

सोहेल मुंबई बेस्ड बिजनेसमन आहे. हंसिका आणि सोहेल एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत बिझनेस पार्टनरही आहेत. सोहेलचा याशिवाय टेक्सटाइल बिजनेस देखील आहे. जो १९८५ पासून गारमेंट्स चे एक्सपोर्ट करत आहेत. दोघे सुरुवातीपासून चांगले मित्र आहेत. याबद्दल सध्या हंसिकाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशी चर्चा आहे कि हंसिकाचे लग्न खूपच रॉयल होणार आहे.

माहितीनुसार हंसिका ४ डिसेंबरला सात फेरे घेणार आहे. पण लग्नाचे फंक्शन २ डिसेंबरला सुरु होणार आहे. हे एक रॉयल डेस्टिनेशन वेडिंग असेल. जयपूरमध्ये होणाऱ्या या लग्नामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सामील होणार आहेत. २ डिसेंबरला सुफी रात्रीचे आयोजन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदी, संगीत होईल. यानंतर कसीनो थीम पार्टी देखील आयोजित केली जाणार आहे. माहितीनुसार ४ डिसेंबरच्या सकाळी लवकर हळदी सेरेमनी होईल आणि त्यानंतर संध्याकाळी दोघे सात फेरे घेतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts