बॉलीवूड अभिनेता गोविंदा अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. गोविंदा ५६ वर्षाचा झाला आहे, पण आज देखील तो सक्रीय आहे. गोविंदा रियालिटीमध्ये शोमध्ये नेहमी पाहायला मिळत असतो. फक्त ९० च्या दशकामध्येच नाही तर आज देखील त्याच्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. जेव्हा कधी त्याचा टीव्हीवर एखादा चित्रपट येतो तेव्हा लोक अनेक तास टीव्हीसमोरून उठत नाहीत. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रीदेखील त्याच्यासाठी वेड्या होत्या. पण गोविंदाने त्याच्या मामीची बहिण सुनितासोबत लग्न केले होते.
१९८७ मध्ये गोविंदा आणि सुनिताने लग्न केले होते, पण काही काळासाठी त्यांनी आपले लग्न जगापासून लपवून ठेवले होते. तथापि त्यांचे हे लग्न जास्त दिवस जगापासून लपून राहिले नाही. लग्नाची बातमी समोर आल्यानंतर देखील गोविंदाच्या स्टारडमवर काहीच परिणाम झाला नाही.
गोविंदा जेव्हा २५ वर्षाचा होता तेव्हा त्याचे लग्न सुनितासोबत झाले होते. यादरम्यान सुनिता फक्त १८ वर्षाची होती. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये गोविंदाने सांगितले होते कि ती एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सुनिताला भेटला होता. सुनिता त्याच्या मामाची मेहुणी होती. सुरुवातीला दोघांचे अजिबात पटत नव्हते.
लग्न लपवण्याच्या गोष्टीवर बोलताना गोविंदा म्हणाला कि मला वाटायचे कि कोणीतरी माझे करियर बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे मला जेव्हा म्हंटले कि आता लग्नाची घोषणा करून टाक तेव्हा मी याची घोषणा केली नाही, ज्याचा मला पश्चाताप आहे.
जेव्हा गोविंदा कपिला शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता तेव्हा इथे देखील देखील सुनिता गोविंदासोबत लग्नाच्या अगोदरचे किस्से सांगताना दिसली होती. गोविंदा आणि सुनिताच्या लग्नाला ३२ वर्षे झाली आहेत. या नात्यामध्ये अनेक समस्या आल्या पण गोविंदा आणि सुनिताने नेहमी एकमेकांची साथ दिली.
दोघे नेहमी एकमेकांसोबत अनेक शोमध्ये देखील दिसले आणि आपल्या सफल लग्नाबद्दल बोलताना दिसले. एका बॉलीवूड अभिनेता म्हणून आपले लग्न टिकवण्यासाठी त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अभिनेता अनेकवेळा या गोष्टीवर देखील बोलताना दिसला आहे.
View this post on Instagram