HomeBollywoodगोविंदा खुलेआम त्याच्या पत्नीसोबत करू लागला असे चाळे, पाहून मुलीने शरमेने लपवला...

गोविंदा खुलेआम त्याच्या पत्नीसोबत करू लागला असे चाळे, पाहून मुलीने शरमेने लपवला चेहरा…

गोविंदा त्याच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेता राहिला आहे. त्याने राजकारणामध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे आणि यश देखील मिळवले. गोविंदाला त्याच्या डांसमुळे ओळखले जाते. कारण डांस करताना जो ज्याप्रकारे एक्सप्रेशंस देतो ते दुसऱ्या कलाकाराला देणे अवघड आहे.

सध्या गोविंदाचा त्याच्या पत्नीसोबतचा आणि त्याच्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि संपूर्ण कुटुंब इंडियन आयडल सीजन १३ च्या दिवाळी स्पेशल एडिशनमध्ये सामील झाले आहे.

इंडियन आयडल सीजन १३ च्या या प्रोमो व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि त्याची पत्नी सुनिता अहुजा त्याची तक्रार करते कि अभिनेत्याने कधीच तिच्यासोबत डांस केला नाही. यावर गोविंदा लगेच तयार होतो आणि पत्नीसोबत आपके आ जाने से गाण्यावर डांस करू लागतो.

अशाप्रकारे पती पत्नी दोघे गाण्यावर डांस करू लागतात. यादरम्यान डांस करताना गोविंदा सुनीताला मिठी मारतो आणि तिला कीस करतो. आईवडिलांना रोमँटिक होताना पाहून, मुलगी टीना आहुजा लाजते आणि आपला चेहरा झाकून घेते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इंडियन आयडॉल सीजन १३ बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी जज म्हणून काम करत आहेत. तर शोचा होस्ट आदित्य नारायण आहे. हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित केला जात आहे. शोमध्ये गायन स्पर्धा असते आणि यामध्ये अनेक कलाकार गेस्ट म्हणून सामील होतात. यादरम्यान गोविंदा आपल्या कुटुंबासोबत शोमध्ये सामील झाला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts