गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील खूपच चर्चेमध्ये आली आहे. दुकानाचे उद्घाटन असो किंवा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस गौतमी पाटीलच्या हजेरीशिवाय कार्यक्रम होणे अशक्य आहे असे म्हंटले जाते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमते. तरुणांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत गौतमी पाटीलने भुरळ पाडली आहे. सध्या गौतमी पाटील तिच्या व्हायरल व्हिडीओमध्ये खूपच चर्चेमध्ये आली आहे.
सध्या गौतमी पाटीलची क्रेज इतकी वाढत चालली आहे कि तिच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणे देखील कठीण झाले आहे. समोर आलेल्या एका माहितीनुसार गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी तब्बल एक ते दीड महिना वाट पहावी लागत आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता तिच्या कार्यक्रमाचे बुकिंग मिळणे अशक्यच आहे.
गौतमी पाटीलची क्रेज सध्या खूपच वाढल्यामुळे ती कार्यक्रमांसाठी देखील घसघशीत मानधन घेते. एका माहितीनुसार एक एका कार्यक्रमासाठी तबल दीड ते दोन लाख रुपये इतके मानधन घेते. कार्यक्रमामध्ये गौतमीसोबत तिची संपूर्ण टीम आणि टिक्निशियन पासून ते परफॉर्मन्स सादर करकऱ्या तब्बल दहा ते बारा जणांचा समावेश असतो.
जर अर्जंट कार्यक्रमाची बुकिंग हवी असल्यास तिची टीम सांगेल तेव्हढे मानधन द्यावे लागते. अशामध्ये विदर्भ, मराठवाड्यासोबत आता गौतमी पाटीलची क्रेज पुणे,कोल्हापूरसोबत पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर तिचे व्हिडीओ अक्षरशः धुमाकूळ घालत असतात. तिची वाढती क्रेज पाहता तिचे मानधन आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.