HomeEntertainmentबिग बॉस १६: गौतमची हरकत पाहून सौंदर्या झाली आऊट ऑफ कंट्रोल, रडत...

बिग बॉस १६: गौतमची हरकत पाहून सौंदर्या झाली आऊट ऑफ कंट्रोल, रडत रडत म्हणाली; ‘माझी इज्जत…’

बिग बॉस १६ मधील नवीन भागात ‘शुक्रवार का वार’ मध्ये सलमान खान ने शुक्रवारी सौंदर्या शर्मा ला विगन फूड आणि शालीन भनोट ला चिकन साठी खूप रागावले होते. त्यानंतर त्याने घरातील व्यक्तींना गैरसमजाचे फुगे फोडण्यासाठी सांगितले.काही घरातल्यांनी सौंदर्या आणि गौतम वीज च्या संबंधांना खोटे आहेत असे सांगितले जात आहेत. या कार्यादरम्यान त्यांच्या संबंधांना खोटे सांगण्यात आले. तथापि सौंदर्याने सांगितले की लोक शालीन भनोत आणि टीना दत्ता च्या संबंधांना खोटे सांगत नाहीत जसे की सगळ्यांना वाटते की शालीन अभिनय करत आहे.

आता निर्मात्यांनी बिग बॉस १६ च्या येणाऱ्या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे, जो शक्यतो ‘शनिवार का वार’ मध्ये दाखवले जाणार आहे. या प्रोमो मध्ये सलमान खान सौंदर्या शर्मा ला एक विडीओ दाखवताना दिसत आहे, ज्याला पाहिल्यानंतर ती पूर्णपणे निराश होते आणि त्याला पाहून ती गौतम ला बोलताना मोठमोठ्याने रडू लागते, तिच्या डोळ्यातून अश्रू निघू लागतात.

विडीओ मध्ये पाहू शकता की सलमान खान सौदर्या ला काही दाखवायला सांगतात, त्यानंतर एक विडीओ क्लीप चालू होते, ज्यामध्ये शालीन भनोट आणि निमृत कौर अहलुवालिया सौदर्याची चेष्टा करतात. तेंव्हा गौतम विज एका सोफ्यावर बसून सर्व पाहून हसत असतो आणि त्यांच्या सोबत मिळून जातो. क्लिप संपताच सलमान सौंदर्या ला म्हणतो की, “ज्याचा तुम्ही बचाव करत होता त्यांनी तुझ्यासाठी काहीही केलेले नाही”.

सौंदर्या शर्मा आणि गौतम विज घरामध्ये एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. विडीओ पाहिल्या नंतर सौंदर्या आणि गौतम विज यांच्यात थोडीफार तंटा पाहायला मिळत आहे. सौंदर्या म्हणते की, ”तुझ्या समोर हे लोक माझी चेष्टा करत आहेत”. गौतम म्हणतो की,”मी काहीही बोललो नाही”. नंतर सौंदर्या रागामध्ये प्रतिक्रिया देताना म्हणते की, “तुम्ही उत्तर द्यायला हवे होते गौतम…माझे वडील असते तर कानफाडीत लावली असती त्याच्या तोंडावर”.

सौंदर्या शर्मा हे बोलता बोलता रडू लागते आणि ती पुढे सांगते की, “कमीत कमी झाली इज्जत तर राखली असती गौतम…कृपा करून लांब हो माझ्यापासून “. एवढे बोलून ती मान खाली घालते आणि जोर जोरात रडू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts