HomeLifeStyleआई नाही तर बहिणच देणार स्वतःच्या भावाला जन्म, तीन मुलांची आई असलेल्या...

आई नाही तर बहिणच देणार स्वतःच्या भावाला जन्म, तीन मुलांची आई असलेल्या महिलेच्या पोटात वाढतोय तिचाच भाऊ…

आई बनणे जगातील सर्वात मोठे सुख आणि ख़ुशी असते. एक स्त्री आई बनल्यानंतरच तिला परिपूर्ण असल्याची जाणीव होते. पण जगभरामध्ये असे कितीतरी कपल आहेत ज्यांना अजून देखील हे सुख मिळाले नाही. काही प्रेग्नंसी शक्य नसते तर अशा देखील महिला आहेत ज्यांना गर्भधारणा होत नाही. पण मेडिकल सायंसने यावर उपाय शोधून काढला आहे ज्याला सरोगेसी म्हणतात.

कॅनाडाची राहणारी फिटनेस इन्फ्लूएंसर कायलेने आपण आपल्या लहान भावाची आई होणार असल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ज्यामुळे ती खूपच खुश आहे. लोकांनी याबद्दल तिला अनेकवेळा सुनावले, पैशासाठी असे करत असल्याचे देखील म्हंटले. पण तिने कुठलाही विचार न करता आपल्या लहान भावाला गर्भामध्ये जागा दिली आहे.

वास्तविक कायलेचे काका-काकू अनेक वर्षांपासून प्रयत्न करून देखील आईवडील बनलेले नाहीत. ज्यामुळे ती नेहमी चिंतीत असायचे. तर कायले तीन मुलांची आई आहे आणि तिला आपल्या काका-काकुंना अशा अवस्थेत पाहून खूपच वाईट वाटायचे. नंतर कायलेने आपले कुटुंब पूर्ण होताच त्यांच्यासमोर सरोगेसीचा प्रस्ताव ठेवला. ज्यामुळे पहिला ते दोघे खूपच गोंधळून गेले पण कायलेची निस्वार्थ भावना पाहून हे कपल तयार झाले. अशाप्रकारे कायले आपल्या काका-काकुंच्या मुलाची सरोगेट मदर बनून आपल्या लहान भावाला जन्म देणार आहे. असे करताना कायलेने आपला एक वाईट अनुभव देखील सांगितला.

२०१६ मध्ये कायलेने आपल्या मुलाला गमावले होते, ज्याचे तिला इतके दुख झाले कि तिला प्रत्येक स्त्रीचे आपल्या मुलाविषयी प्रेम आणि तळमळ समजून आली. मुल न होण्याचा वेदना तिला चांगल्याच माहिती होत्या यामुळे तिने काका-काकूंच्या वाईट जीवनामधील वेदना समजू शकत होती.

तथापि सोशल मिडियावर अनेक लोकांनी तिला पैशाची लोभी असल्याचे देखील म्हंटले. ज्यावर कायलेने स्पष्ट केले कि त्यांच्या इथे पैशासाठी सरोगेसी कायदेशीर अपराध आहे. पण जर खऱ्या अर्थाने गरजवंत स्त्रिया असे करतात, पण ती आपल्या कुटुंबासोबत काहीही चुकीचे करत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts