सोशल मिडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचे काही सांगता येत नाही. यामध्ये आपल्याला कधी माजोरंजक तर कधी धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे ज्यामध्ये दोन तरुणींमध्ये तुफान राडा पाहायला मिळत आहे.
हाणामारीचे व्हिडीओ सोशल मिडियावर खूप पाहिले जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुणी भरदिवसा हाणामारी करत आहेत. या हाणामारीचे कारण समजल्यानंतर तुम्ही देखील डोक्याला हात लावाल. ‘मेरा बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो धोपतुंगी ना उसको’ आलिया भट्टचा हा डायलॉग तर तुम्हाला चांगलाच माहिती असेल. असेच काहीसे इथे देखील घडताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओमधील तरुणी एका बॉयफ्रेंडवरून एकमेकींना दे धपाधप देत आहेत. एकमेकींच्या झिंज्या उपटत दोघींनी तुफान राडा केला आहे.
दोन्ही तरुणींचे एकाच वेळी एका तरुणासोबत रिलेशन सुरु होते. दोघींना याची कल्पना देखील नव्हती. पण जेव्हा दोघी पार्कमध्ये एकमेकींच्या समोर आल्या तेव्हा त्या तरुणाच पितळ उघड पडल आणि दोघी मुलींचा याची जाणीव झाली. ज्यानंतर दोघींमध्ये एकच जुंपली.
हा व्हिडीओ यवतमाळमधील वणीच्या शिवाजी पार्कमध्ये घडला आहे. या तरुणीचा राडा पाहण्यासाठी पार्कमधील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यातील काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ ट्वीटरवर Viral Fever या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये राडा…
व्हिडीओ व्हायरल, यवतमाळमधील घटना…#Viral #Girlfight #Trending pic.twitter.com/DaMTO4InFq— Viral Fever (@Viral_Kida) February 28, 2023