HomeViralअपघातामध्ये आजोबांचा गमावले, नातीने दुसऱ्यांना वाचवण्यासाठी केले असे काम कि लोक करू...

अपघातामध्ये आजोबांचा गमावले, नातीने दुसऱ्यांना वाचवण्यासाठी केले असे काम कि लोक करू लागले कौतुक…व्हिडीओ व्हायरल…

भारतामध्ये दररोज शेकडो अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. तत्पही आपण रस्त्यावर चालताना खबरदारी घेतली तर हे टाळता येऊ शकते. सोशल मिडियावर एक मुलगी रस्त्यावर सायकलवरून जाणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी उतरली आहे. ती त्यांच्या सायकलवर लाईट लावून त्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी मदत करत आहे आणि आता हा व्हिडीओ पाहून लोक तिचे कौतुक करत आहेत. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून शेयर केला आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी अवनीश शरण अनेकवेळा असे हृदयस्पर्शी व्हिडीओ शेयर करताना पाहायला मिळत ज्यामुळे इंटरनेट यूजर्सची रुची आणखीनच वाढलेली पाहायला मिळते. यावेळी त्यांनी ट्विटरवर एका २२ वर्षाच्या मुलीचा व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती मुलगी रस्ते अपघात टाळण्यासाठी सायकलवर सेफ्टी लाईट लावताना पाहायला मिळत आहे.

लखनऊची ख़ुशी पांडेने आपल्या आजोबांना रस्ते अपघातामध्ये गमवले होते. तिचे आजोबा सायकल चालवत होते तेव्हा एका कारने त्यांना टक्कर मारली होती कारण कार स्वार त्यांना पाहू शकला नव्हता. तेव्हापासून ख़ुशी पांडेने सायकलवर १५०० फ्री लाल लाईट लावल्या आहेत.

२२ वर्षाची ख़ुशी पांडेला नेहमी शहराच्या प्रमुख चौकांमध्ये एक घेऊन उभारलेली पाहू शकता. ज्यावर लिहिलेले असते कि सायकलवर लाईट लावून घ्या. व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अनेक सोशल मिडिया युजर्सनी ख़ुशी पांडेच्या या कामाचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे कि या महान कार्यासाठी तुला आशीर्वाद.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts