HomeBollywoodलग्नात ढसाढसा रडली होती जेनेलिया, रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल,...

लग्नात ढसाढसा रडली होती जेनेलिया, रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल, पहा व्हिडीओ…

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेड चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहेत. रितेश आणि जेनेलियाच्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत धुमाकूळ घातला आहे. चित्रपटामधील रितेश आणि जेनेलियाची केमेस्ट्री दर्शकांना खूपच आवडली आहे.

रितेश आणि जेनेलियाची ऑफ स्क्रीन केमेस्ट्री देखील चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम करतात. दरम्यान या क्युट कपलचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ रितेश आणि जेनेलिया यांच्या लाग्नामधील आहे. त्यांच्या लग्नातील फोटो रोनिका कंधारी यांनी काढले होते.

गेल्यावर्षी रोनिकाने रितेश-जेनेलियाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडीओ शेयर केला होता. जो सध्या खूपच व्हायरल होत आहे. तसा तर हा व्हिडीओ खूप जुना आहे पण चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही रितेश-जेनेलियाच्या लग्नातील खास क्षण पाहू शकता.

जेनेलियाने देखील हा व्हिडीओ इंस्टा स्टोरीमध्ये शेयर करत सुंदर व्हिडीओसाठी रोनिकाचे आभार मानले आहेत. व्हिडीओमध्ये जेनेलिया मराठमोळ्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी ती रडताना देखील पाहायला मिळत आहे. हा रडतानाचा फोटो जेनेलियाच्या विदाईचा फोटो आहे. लग्नानंतर माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मुलगी हळवी होत असते. जेनेलिया देखील यामध्ये अपवाद नाही. विदाईच्या वेळी जेनेलियाला देखील अश्रू अनावर झाले होते.

रितेश आणि जेनेलियाची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. २००३ मध्ये दोघे तुझे मेरी कसं चित्रपटाच्या शुटींगदरम्यान भेटले होते. रितेशचा हा डेब्यू चित्रपट होता तर जेनेलिया हि साऊथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. जेनेलिया जेव्हा पहिल्यांदा रितेशला भेटली तेव्हा तिला वाटले कि हा तर मुख्यमंत्र्यांचा वाया गेलेला मुलगा आहे. पण नंतर हळू हळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांनी एकमेकांना १० वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले आणि दोघांना आता दोन मुले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronicka Kandhari (@ronickakandhari)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts