HomeViralपाच किन्नरांनी आपल्या गुरुसोबत केले लग्न, साडी नेसून पूर्ण केले सर्व विधी,...

पाच किन्नरांनी आपल्या गुरुसोबत केले लग्न, साडी नेसून पूर्ण केले सर्व विधी, आता लावणार सिंदूर…करणार शृंगार…अनोख्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल…

छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. इथे पाच किन्नरांनी आपल्या गुरुसोबत लग्न केले. किन्नरांकडून पहिल्यांदाच लोक कल्याणसाठी ३ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. पहिल्या दिवशी रविवारी किन्नरांनी आपले आराध्य दैवत बहुचरा मातेची पूजा केली, दुसऱ्या दिवशी सोमवारी हळदीचे विधी केले आणि तिसऱ्या दिवशी मंगळवारी अनेक ठिकाणांहून पोहोचलेल्या किन्नरांनी कलश यात्रा काढली.
रविवारी बहुचरा मातेची पूजा केल्यानंतर पाच किन्नर माही, ज्योति, रानी, काजल, सौम्याच्या लग्नाचे विधी करण्यात आले. ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील लोक देखील सामील झाले होते आणि सर्वांनी किन्नरांच्या शरीरावर तेल, हळद चढवली. त्यांच्या विवाह त्यांचेच किन्नर गुरु शारदा नायकसोबत करण्यात आला. किन्नरांच्या या विवाहामध्ये एखाद्या नवीन नवरीसारखा पेहराव करण्यात आला होता. तर किन्नरद्वारे वराच्या रुपामध्ये देखील हातामध्ये कट्यार घेऊन हळदीची विधी पूर्ण करण्यात आली.
या किन्नरांमध्ये माहीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आपल्या याच रुपाला आपला आधार मानून तिने इतर किन्नरांना सन्मानाचे जीवन जगण्यास प्रवृत्त करत आहे. माही म्हणाली कि किन्नर देखील माणूसच आहे आणि त्यांना देखील जीवन जगण्याचा अधिकार आहे. जे सर्व महिला पुरुष करतात. आता गुरुच्या नावाचे सिंदूर आणि शृंगार करणार. या आयोजनमध्ये किन्नरांच्या कुटुंबाकडून देखील आनंद साजरा करण्यात आला.
किन्नरांच्या या लग्नामध्ये आता त्यांचे कुटुंबीय देखील सामील होऊ लागले आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि हे पाहून त्यांना देखील आनंद होत आहे आणि दुख देखील. ज्या मुलाचे लग्न करून सून घरामध्ये अनु इच्छित होते त्याचे हे रूप पाहून दुख होते. पण त्याच्या आनंदामध्येच आमचा आनंद आहे. कुटुंबीयांनी म्हंटले कि तीन दिवसाच्या या आयोजनमध्ये देवीच्या पुजेसोबत हळदीचे विधी, डांस आणि भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts