सध्या लग्नाचा जोरदार सीजन सुरु आहे. सेलेब्रिटी पासून सामन्यांपर्यंत लोक धुमधडाक्यामध्ये लग्न करत आहेत. लग्नामध्ये नाच-गाणे आणि मजा-मस्ती नसेल तर लग्न लग्न अपूर्ण वाटते. वर आणि वधूचे मित्र आणि नातेवाईक लग्नामध्ये डांस करून धमाल मस्ती करतात. लग्नामध्ये कपल, दीर-वहिनी आणि मेहुणा-मेहुणेचे डांस खूप पसंद केले जातात. पण जेव्हा डांस फ्लोरवर बाप-लेकीची जोडी उतरते तेव्हा एक वेगळाच नजारा पाहायला मिळतो. बाप-लेकीचे प्रेम पाहून लोक कधी कधी इमोशनल होतात.
सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बाप-लेकीची जोडी डांस करताना पाहायला मिळत आहे. बाप-लेकीच्या जोडीने लोकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ एका लग्नामधला आहे. ज्यामध्ये मुलगी तिच्या वडिलांसोबत डांस करताना पाहायला मिळत आहे.
सोशल मिडियावर या व्हिडीने लोकांचे मन जिंकले आहे. लग्नामध्ये बाप-लेकीच्या जोडीने इतका सुंदर डांस केला आहे कि लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ShaadiBTS या अकाऊंटवरून शेयर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत चाळीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर ३३ हजार पेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केले आहे.
बाप-लेकीच्या जोडीने कार्तिक कॉलिंग कार्तिक चित्रपटामधील उफ्फ तेरी अदा या गाण्यावर परफॉर्म केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये बाप-लेकीच्या जोडीचे खूप कौतुक करत आहेत, कारण दोघांनी एक देखील स्टेप विसरली नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव रुचिका बंसल आहे तर तिच्या वडिलांचा नाव दीपक बंसल आहे.
View this post on Instagram