HomeCricketहातामध्ये घेतली बॅट, चेंडूने केले अनेक रेकॉर्ड्स, सचिन-सेहवाग देखील मोडू शकले नाहीत...

हातामध्ये घेतली बॅट, चेंडूने केले अनेक रेकॉर्ड्स, सचिन-सेहवाग देखील मोडू शकले नाहीत अजित आगरकरचा रेकॉर्ड….

क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर रेकॉर्डचा बादशाह आहे. पण टीम इंडियामध्ये एक खेळाडू असा देखील होता, ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. या खेळाडूने एक फलंदाज म्हणून आपले करियर सुरु केले होते. पण गोलंदाजीने त्याला एक वेगळी ओळख दिली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मोठ्या संघांना त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये नांगी टाकायला लावली होती.

आम्ही बोलत आहोत भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरबद्दल. क्रिकेटमध्ये करियर बनवण्यासाठी बॅट घेतली, पण आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तसे तर हे नाव आता चर्चेमध्ये नाही, तर सचिन-सेहवागचे नाव आज देखील चर्चेमध्ये असते. पण अजित आगरकरच्या नावावर असे रेकॉर्ड आहेत जे दिग्गज फलंदाज देखील मोडू शकलेले नाहीत.

तसे तर टीम इंडियाकडे असे अनेक फलंदाज होते ज्यांनी वेगवान खेळी केल्या. पण अजित आगरकरने २१ चेंडूमध्ये केलेल्या ५० धावांचा रेकॉर्ड आज देखील अबाधित आहे. वनडेमध्ये हे भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक आहे. इतकेच नाही तर त्याने इंग्लंडविरुद्ध क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणार्या लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावले होते. हा कारनामा त्याने ८ नंबरवर खेळताना केला होता. या मैदानावर सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगसारखे दिग्गज खेळाडू देखील शतक झळकावू शकलेले नाहीत.
या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने खूप नाव कमवले. त्याने भारतातर्फे वनडे मध्ये सर्वात जास्त ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १५१ सामन्यांमध्ये १२ वेळा असे केले आहे. याशिवाय त्याने सर्वात वेगवान ५० विकेट्स देखील पूर्ण केले होते.
हा कारनामा त्याने फक्त २३ वनडेमध्ये केला होता. १९९९, २००३ आणि २००७ मध्ये तो वर्ल्ड कप टीमचा देखील भाग राहिला. त्याने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts