HomeBollywood‘नागा चैतन्यला घटस्फोट दे आणि माझ्यासोबत...’ ‘या’ व्यक्तीने दिली होती समांथा रुथ...

‘नागा चैतन्यला घटस्फोट दे आणि माझ्यासोबत…’ ‘या’ व्यक्तीने दिली होती समांथा रुथ प्रभूला असली ऑफर…

समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचे जोडी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील परफेक्ट जोडींपैकी एक मानली जात होती. पण दोघांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबत पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेत राहत असते.

नागा चैतन्य आणि समांथा यांचा घटस्फोट झाला असून समांथा अजूनदेखील यामुळे चर्चेत असते. जेव्हा समांथा आणि नागा यांचे वैवाहिक आयुष्य चांगले होते तेव्हा एका व्यक्तीने चक्क समांथाला ऑफर दिली होती. ज्यामुळे खूपच खळबळ उडाली होती.

त्या व्यक्तीने समांथाला म्हंटले होते कि तू नागा चैतन्यला घटस्फोट दे आणि माझ्यासोबत लग्न करत. असे म्हणणारी व्यक्ती समांथाची मोठी फॅन होती. हि गोष्ट २०२० ची आहे. समांथाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हाईट ड्रेसमध्ये तिचे काही क्युट फोटो शेयर केले होते.

फोटोमध्ये समांथा खूपच सुंदर आणि क्युट दिसत होती. फोटो शेयर करत समांथाने कॅप्शनमध्ये फीलिंग गुड असे लिहिले होते. समांथाच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या एका चाहत्याने तिला म्हंटले होते कि तुम्ही नागाला घटस्फोट देऊ शकता, आपण दोघे लग्न करू.

समांथाने देखील यावर प्रतिक्रिया देत उत्तर दिले होते आणि लिहिले होते कि, हे खूप कठीण आहे, पण एक काम करा तुम्ही चैतन्यलाच याबद्दल विचारा. समांथाला तिच्या चाहत्याने हे फक्त तिच्यावर असलेल्या प्रेमासाठी विचारल होतं.

मात्र लग्नाच्या चार वर्षानंतर नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू घटस्फोट घेऊन वेगळे झाले. विशेष म्हणजे काही काळ एकमेकांना डेट केल्या नंतर दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. हे लग्न साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात शाही लग्नांपैकी एक होते. पण त्यानंतर २०२१ मध्ये दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts