नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा इवेंट भलेही संपला असेल, पण त्यामधील काही रंजक गोष्टी सध्या खूपच चर्चेचा विषय बनल्या आहेत. या इवेंटमध्ये फक्त बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमधील सेलेब्सनी देखील हजेरी लवली होती. सर्वांनी एकापेक्षा एक जबरदस्त ड्रेस घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले पण यादरम्यान अंबानी इवेंटमध्ये सोन्याचा ड्रेस घातलेली एक महिला खूपच चर्चेचा विषय बनली. ज्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर खूपच होत आहे.
वास्तविक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर सुहानी पारेखने २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस घालून इवेंटमध्ये हजेरी लावली. NMACC इवेंटच्या भव्य लॉन्चच्या दुसऱ्या दिवशी सामील झालेल्या प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनरने २४ कॅरेट गोल्ड बेली आर्मर घातला होता. याचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. इतकेच नाही तर तिने आत्मविश्वासाने आपले बेबी बंप फ्लॉन्ट देखील केले. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधले तिचे फोटो सध्या खूपच व्हायरल झाले आहेत.
सुहानी पारेख प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यामध्ये आहे आणि तिच्या चेहऱ्यावर ग्लो स्पष्ट दिसत आहे. सुहानीच्या क्रिएटिविटी लुकने इवेंटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २४ कॅरेट गोल्ड बेली आर्मरमध्ये सुहानी खूपच सुंदर दिसत होती. तिने या ड्रेससोबत कानामध्ये इयररिंग्स, नेकपीस आणि रिंग घातली होती, जी खूपच आकर्षक दिसत होती.
पूर्वीच्या काळामध्ये बेली आर्मरचा वापर सैनिकांद्वारे युद्धाच्या मैदानामध्ये आपल्या संरक्षणासाठी केला जात होता. अनेक शॉपिंग वेबसाइट्सवर बेली आर्मर सहज मिळतात. आता हे एंटी रेडिशनविरुद्ध बाळाच्या संरक्षणासाठी कवच म्हणून वापरले जाते. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च दरम्यान देश विदेशामधील कलाकार, धर्म गुरु, खेळ जगत आणि बिजनेस जगतामधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
View this post on Instagram