चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ग्लेमरचे जग सोडून अध्यात्मात प्रवेश केला आहे. अन्नू अग्रवाल, सना खान आणि जायरा वसीम सारखे अनेक चेहरे आहेत ज्यांनी इंडस्ट्री मध्ये आपली एक मोठी ओळख बनवली.
परंतु नंतर त्यांनी दिखाव्याचे जग सोडून देवाच्या श्रद्धेकडे जाणे योग्य मानले. आज आम्ही एका अशाच अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जी कधीकाळी प्रादेशिक चित्रपटसृष्टीमधील एक प्रसिद्ध चेहरा समजली जायची परंतु आता तिने श्रीकृष्णाच्या आश्रयाला आली आहे.
खरं तर, आम्ही इथे भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडित बद्दल बोलत आहोत, जी आजकाल श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न आहे. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम वर तुम्हाला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील ज्यामध्ये ती भगवान कृष्णा बरोबर बोलताना दिसत असते. प्रियंका दररोज कायम प्रेक्षकांच्या सोबत तिने फोटो आणि डान्स व्हिडीओ शेअर करत असते. ती जास्तीत जास्त वेळ हा वृंदावनात व्यतीत करते आणि जेव्हा देखील वेळ मिळेल तेव्हा राधा राणी चे दर्शन करण्यास जाते.
अभिनेत्री श्रीकृष्णाला तिचा सर्वात जवळचा मित्र मानते. तिने एक फोटो शेअर करत कैप्शन मध्ये लिहिले कि, “माझ्या प्रिय मित्रा, तू माझे आयुष्य बदलले आहेस. काय सांगू तुला, तुच माझे सर्वस्व आहेस, तुला सर्व काही माहिती आहे. मला भक्तीने पुढे ने, हेच फक्त मी मागणे मागते. हि अभिनेत्री आता भगवान कृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे मग्न आहे आणि तिला आता संसारिक प्रेमाची पर्वा नाही हे तिच्या व्हिडीओ वरून स्पष्ट पणे दिसून येते. ती रात्र दिवस श्रीकृष्णाचा जप करते आणि त्याच्या बरोबर फिरते.
प्रियांकाचे नाव एमएस लिक मध्येही आले होते आणि त्यानंतर तिला बदनामीला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, एमएमएस लिक प्रकरणामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडे तिने तिच्या एमएमएस लिक प्रकरणावर मौन सोडले आहे. गेल्या वर्षी अभिनेत्रीचा एका खाजगी व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. तेव्हा पासून तिला टीकेला सामोरे जावे लागत होते. आता बऱ्याच दिवसांनी तिने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
केवळ तिची बदनामी करण्यासाठी कोणीतरी तिचे नाव त्या व्हिडीओ मध्ये जोडल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. सोशल मिडीयावर तिने सांगितले, ‘माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रियंका पंडित ने तिचे करिअर उध्वस्थ झाल्याचा खुलासा केला आहे. आता अभिनेत्रीने कायदेशीर कारवाई करत पोलिसांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रियांकाने मौन तोडले आणि व्हायरल व्हिडीओ मध्ये ती नसल्याचे स्पष्टपणे सांगते, उलट तिची प्रतिमा डागळण्यासाठी कोणीतरी हे केले आहे.