असे म्हंटले जाते कि हिम्मत असेल तर रस्ता अवघड नसतो आणि कोणीही अडवू शकत नाही. अशीच एक स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. एक मुलगा ज्याचा जन्म गरिबीमध्ये झाला होता, गरिबी इतकी कि एक टाईमचे खायला देखील मिळत नव्हते.
जेव्हा घरामध्ये एखादा पाहुणा यायचा तेव्हा त्या मुलाला वाटायचे कि आज काहीतरी चांगले खायला मिळणार आहे. वडील स्वतः झोपडीमध्ये राहायचे, पण दुसऱ्यांसाठी इमारती बनवायचे कारण ते बांधकाम मजूर होते तर आई शेतामध्ये काम करायची. पुस्तके खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक डीएसपी शेतामध्ये आपल्या आईला भेटण्यासाठी गेला होता. आम्ही त्याची डीएसपी संतोष पटेलबद्दल बोलत आहोत ज्याने ५ वर्षे मेहनत करून वर्दी मिळवली होती. ग्वाल्हेरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटीगाव येथे तैनात असलेले पोलिस उपअधीक्षक संतोष पटेल आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सांगितले की, ते खूप संघर्ष करून येथे पोहोचले आहेत.
संतोष पटेलने सांगितले कि त्याची आई घरखर्च भागवण्यासाठी दुसऱ्यांचा शेतामध्ये काम करायची. त्यांचे घर जंगल भागामध्ये होते ज्याच्या जवळून एक नदी जात होती. यामुळे शेती होत नव्हती. संतोषने सांगितले कि आम्ही धान्य देखील खूप मेहनतीने मिळवत होतो. संतोष पटेलने खूप संघर्ष केला आणि सांगितले कि एका बिस्किटासाठी देखील त्याला मेहनत करावी लागायची पण आज आपल्या संघर्षामुळे तो डीएसपी झाला आहे.