सोशल मिडियावर तुम्ही अनेक प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ पाहिले असतील जिथे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आपला जीव धोक्यात घालून असे दुर्मिळ फोटो शेयर करतात. जे आपण आधी कधीच पाहिलेले नसतात. सोशल मिडियावर तुम्ही अनेक खतरनाक प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ पाहिले असतील. ज्यामध्ये कधी साप शिकार करताना दिसतो तर काही स्वतःच शिकार बनताना दिसतो.
सध्या असाच एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे ज्यामध्ये इज साप पाहायला मिळत आहे. तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल कि सापाला दोन तोंड असतात आणि चार डोळे असतात. पण कधी असे पाहायला मिळाले नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दुर्मिळ प्रजातीचा साप पाहायला मिळत आहे ज्याला दोन तोंड आहेत आणि चार डोळे आहेत. जो पाहून सोशल मिडिया युजर्स देखील हैराण झाले आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि एक साप आहे आणि त्याला दोन तोंड आणि चार डोळे आहेत. दुर्मिळ प्रजातीच्या या सापाचा जन्म २ वर्षांपूर्वी फ्लोरोडामध्ये झाला होता. या सापाचे नाव मेडिसा आहे. हा एक मादी साप आहे, जो दिसायला खूपच सुंदर आहे. याची लांबी ३ फुट आहे.
असे म्हंटले जाते कि या सापाच्या दोन्ही डोक्यांनी एकमेकांना खाण्याचा प्रयत्न केला आहे. या दुर्मिळ प्रजातीच्या सापाला पाहून सोशल मिडियावर लोक हैराण होत आहेत. अनेक सोशल मिडिया युजर्सवर या व्हिडीओ प्रतिक्रिया देऊन आश्चर्य व्यक्त केले आहे.
अमेरिकी कंटेंट क्रिएटर ब्रायन बार्ज़िकने देखील सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये दोन तोंडाचा साप पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेयर करताना त्याने लिहिले आहे कि या अॅडवेंचरची मजा घ्या. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि सापाला दोन तोंड आहेत आणि दोन्ही तोंडाने तो दोन उंदीर खात आहे.
या दुर्मिळ प्रजातीच्या सापाचा व्हिडीओ आतापर्यंत ६ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. जर तुम्हाला हा व्हिडीओ पाहायचा असेल तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यूट्यूबवरील Uni Fact नावाच्या चॅनलला भेट देऊन पाहू शकता.