HomeViralआरशामध्ये स्वतःला पाहून त्याच्यासोबतच भांडू लागले गाढव, पहा फनी व्हायरल व्हिडीओ...

आरशामध्ये स्वतःला पाहून त्याच्यासोबतच भांडू लागले गाढव, पहा फनी व्हायरल व्हिडीओ…

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असले तरी काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती गाढवासोबत एक फनी कंटेंट तयार करत आहे. या मजेदार व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे.

माणसांना सजण्या सवरण्याची सवय असते, पण प्राण्यांना आरशात बघायची सवय नसते. त्यांना चुकून कधी आरसा दिसला तर त्यांची प्रतिक्रिया खूप वेगळी असते. माणूस आरशामध्ये आपला चेहरा पाहतो तर प्राणी जेव्हा आरशामध्ये पाहतात तेव्हा समजतात की पलीकडे दुसरा प्राणी आहे आणि ते त्याच्याशी त्यांच्या पद्धतीने वागू लागतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गाढव मोकळ्या मैदानात फिरताना दिसत आहे. तो काहीतरी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी शोधत असल्याचे दिसते. एक व्यक्ती तिथे पोहोचते आणि समोर मोठा आरसा दाखवू लागते. गाढवाने आरशात पाहिल्याबरोबर त्याला धक्काच बसतो. मग गाढव त्या आरशामध्ये प्राण्याला पाहून ओरडू लागतो. त्याची प्रतिक्रिया पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. त्याचवेळी तुम्ही विचार करू लागाल की गाढव मनात काय विचार करत असेल?

गाढवाची प्रतिक्रिया देखील विचित्र होती. सुरुवातीला तो पूर्णपणे गोंधळून जातो आणि नंतर अचानक प्रतिक्रिया देऊ लागतो. गाढवासोबतचा हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर beautiful_new_pix नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts