कुत्रा हा सर्वात संवेदनशील प्राणी मानला जातो. तो पाळीव असण्यासोबत प्रत्येकाला प्रिय असतो. कुत्रा हा सर्वांचा सर्वात चांगला मित्र आहे. याचा अर्थ असा नाही कि तो कधी नाराजी व्यक्त करू शकत नाही. एखाद्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याप्रमाणे कुत्र्यांना देखील आपल्या मालकाचे अटेंशन हवे असते. जेव्हा त्यांना अटेंशन मिळत नाही तेव्हा ते काहीही करतात. सोशल मिडियावर असाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो तुमचे होश उडवेल.
ट्विटरवर @buitengebieden या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे ज्यामधी कुत्र्याचे कारस्थान पाहन तुम्ही दंग व्हाल. एका कुत्र्याने रागाच्या भारत चक्क सुरंगच खोडून काढली. यासाठी त्याला जवळ जवळ ४ तास मेहनत घ्यावी लागली आणि असे खोदकाम केले कि पाहून मालकाचे देखील होश उडाले. हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओला आतापर्यंत २६ लाखपेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्र्याच्या कारनाम्यामुळे प्रत्येकाला हैराण केले. त्याने घराच्या अंगणामध्ये खोदकाम करून असा सुरंग तयार केली. जेव्हा मालकीण तिथे पोहोचली तेव्हा तो नजारा पाहून दंग झाली. नंतर तिने कुत्र्याच्या ४ तासाच्या मेहनतीचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद करू सोशल मिडियावर शेयर केला. सुरंग बनवण्याच्या चक्करमध्ये कुत्र्याने फक्त अंगणच घाण केले नाही तर भिंत देखील मातीने लाल करून टाकली.
No way.. 😂 pic.twitter.com/BVxiUD4NdZ
— Buitengebieden (@buitengebieden) February 20, 2023