सोशल मिडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओजमध्ये सर्वात जास्त प्राण्यांचे व्हिडीओ लोकांना खूप पसंद येतात. खासकरून पाळीव प्राण्यांचे क्युट व्हिडीओ सर्वांना पसंद येतात. पण जर दोन प्राण्यांच्या मैत्रीचा क्युट व्हिडीओ असेल तर तो पाहिल्यानंतर चेहऱ्यावर हसू नक्की येते.
जर तुम्ही विचार करत असाल कि प्राण्यांमध्ये सहानुभूती आणि मैत्री यासारख्या भावना कमी असतात तर ते चुकीचे आहे कारण जे ते एखाद्याला आपले मानत असले तर त्यांची ते आयुष्यभर साथ देतात. अशाच दोन प्राण्यांच्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यांची मैत्री आणि आपलेपणा पाहून तुम्हाला देखील आनंद वाटेल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बदकाच्या पिल्लाला तोंडामध्ये धरून घेऊन जाताना पाहू शकता, जो आपल्यासोबत त्याला उंच दगडावर घेऊन जातो आणि नंतर दोघे एकमेकांसोबत बसलेले दिसतात. ते एकमेकांसोबत खेळतात आणि नंतर माणसाप्रमाणे खांद्यावर हात ठेऊन छोटा डॉग बद्कासोब्त आपली मैत्री आणि प्रेम व्यक्त करतो.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून nature__life__beauty नावाच्या अकाऊंटवरून शेयर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५.२ मिलियन म्हणजेच ५२ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर २ लाख पेक्षा जास्त लोकांनी याला पसंद केले आहे. व्हिडीओवर कमेंट करून अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
View this post on Instagram