लग्नाच्या तयारीची जितकी काळजी कुटुंबियांना असते, त्यापेक्षा जास्त नवरा – नवरी त्यांच्या लुक आणि स्टेज वरील एंट्री ला घेऊन चिंतीत असतात. आजकाल जेव्हा सर्वकाही लोक सोशल मिडीयासाठी करत असतात, त्यामुळे विवाहांनाही या प्रथेपासून परावृत्त केले जात नाही. अभिनेता – अभिनेत्रींच्या लग्नाप्रमाणे नवरा नवरी त्यांचे महाग कपडे, मेकअप, दागिने आणि अन्य काही वस्तू त्याप्रमाणे पाहिजे असतात, जसे अभिनेता अभिनेत्री त्यांच्या लग्नामध्ये करतात. स्टेज वरील एंट्री ची देखील ते खूप लक्ष देतात. अनेक लोक त्यांचे एंट्री चे गाणे देखील आधीपासूनच ठरवून ठेवतात. असेच काही एका नवरीने देखील केले पण जेव्हा एंट्री झाली तेव्हा डीजेवाल्याने दुसरेच गाणे वाजवले. मग काय तर, नवरी अशी नाराज झाली कि तिने स्टेज वर जाण्यास नकार दिला.
इंस्टाग्राम अकौंट वर लग्नाशी संबंधित खूपच रोमांचक व्हिडीओ पोस्ट केले जातात. काही दिवसांआधी एक मजेशीर पण खूपच क्युट व्हिडीओ शेअर केला गेला जो एका नवरीचा होता. जसे आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे स्टेज वर जाण्याआधी आजकाल लोक आवडीचे गाणे निवडतात. याचप्रमाणे व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नवरीने देखील एक गाणे निवडले होते तिचे नाव अनुराधा झा आहे. पण अनुराधाला तेव्हा राग आला जेव्हा तिच्यासाठी चुकीचे गाणे वाजवण्यात आले होते.
व्हिडीओ मध्ये स्टेज वर जाण्यासाठी तयार असलेल्या आणि एंट्रीच्या आधी तिचे निवडलेले गाणे डीजे लावतो. पण अनुराधाने गाण्याला मधूनच लावण्यास सांगितले होते, पण डीजे त्याला सुरुवातीपासूनच लावतो. अनुराधा चिडते आणि कुटुंबियांना सांगते कि त्याने चुकीचे गाणे लावले आहे, ती आता स्टेज वर जाणार नाही. नंतर तिचे कुटुंबीय तिला शांत करतात आणि धीर ठेवण्यास सांगतात. तोपर्यंत तिच्या म्हणण्यानुसार गाणे वाजवण्याचा प्रयत्न चालू असतो.
या मजेदार व्हिडीओ ला दीड लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे तर अनेक लोकांनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अनेक लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे –“यामुळे बालविवाह करू नये. समंजस पणातर येऊ देत”. दुसऱ्या एकाने लिहिले आहे –“अरे भाऊ वाजव ना १ मिनिट १८ सेकंदापासून!”. तर आणखी एकाने लिहिले आहे –“कोणीतरी प्लीज अशा मुलींना सांगा कि चुकीच्या एंट्री गाण्यापेक्षा आयुष्यात मोठे प्रश्न आहेत, जरा एकदा लग्न कर, मग चुकीच्या एंट्री गाण्याचा तिला त्रास होणार नाही आणि हे तिला खूप बालिश वाटेल”.
View this post on Instagram