अभिनेत्री दिया मिर्जा प्रत्येक मुद्यावर आपले मत मोकळेपणाने मांडत असते, मग ते काहीही असो. सध्या दिया मिर्जा मातृत्वाचा आनंद घेत आहे. मुलाचा सांभाळ करण्यातच तिचा पूर्ण दिवस निघून जातो. अलीकडेच एका मुलाखतीत दिया मिर्जा ने मोठे वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीचे म्हणणे आहे कि लग्नाच्या आधी सेक्स आणि गर्भधारणा पूर्णपणे वैयक्तिक पर्याय आहेत आणि फक्त हेच लोक साजरा करू शकतात जे त्यांच्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी घेवू शकतात. दिया मिर्जा म्हणाली कि आजच्या काळात देखील लोकांचे विचार म्हणावे तितके चांगले नाहीत, जेवढे कि ते दाखवतात.
दिया मिर्जा ने व्यावसायिक वैभव रेखी सोबत फेब्रुवारी २०२१ मध्ये विवाह केला होता. अभिनेत्री चे हे दुसरे लग्न आहे. लग्नाच्या नंतर दिया मिर्जा ने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यावेळी अभिनेत्रीला लग्न आणि गरोदर पणावर प्रश्न केले गेले. तिला ट्रोल केले गेले. त्यावर दिया मिर्जा ने स्पष्टीकरण देताना म्हणाली कि गर्भधारणेमुळे तिने लग्न केले नाही. वर्ष २०२१ जुलै मध्ये दिया मिर्जा ने पती वैभव रेखी सोबत बाळाचे स्वागत केले. बाळाचे नाव अवयान आहे.
अलीकडेच ई टाइम्स सोबत बोलताना दिया मिर्जा म्हणाली कि लग्नाच्या आधी सेक्स आणि गर्भधारणेला आपल्या समाजातील लोक आपला हक्क मानतात. मला वाटते कि जेव्हा गोष्ट स्वतः च्या हक्काची असते आणि त्याच्याशी संबंधित ताकत तर त्याला तेच लोक साजरा करू शकतात जे आपले निर्णय आणि जबाबदारी स्वतः घेणे जाणतात. ते आपल्या निर्णयाला घाबरत नाहीत.
दिया मिर्जा ने पुढे सांगितले कि आपल्या समाजातील अनेक लोक असे देखिल आहेत जे पहिला सेक्स आणि गर्भधारणेचे विचार वाईट मानले जातात, परंतु काही लोक असे देखील आहेत जे याला स्वतः चा निर्णय मानतात. ते मानतात कि कोणी अशाप्रकारचे पाउल उचलले तर हा त्याचा अधिकार आहे. मला नाही वाटत कि आपण ज्याप्रकारे विचार करतो, त्याप्रकारचे आपले विचार देखील आहेत. आपण स्वतः ला जेवढे मोकळ्या विचाराचे समजतो, तेवढे नाही आपण.
कामाबद्दल बोलाल तर अभिनेत्री लवकरच अनुभव सिन्हा चा चित्रपट ‘भीड’ मध्ये दिसणार आहे. याच्या अगोदर दिया मिर्जा ‘थप्पड’, ‘दस’, आणि ‘कैश’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्याव्यतिरिक्त दिया मिर्जा च्या जवळ तापसी पन्नू चा चित्रपट ‘धक धक’ देखील आहे. त्यामध्ये फातिमा सना शेख, संजना सांघी आणि रतना पाठक शाह प्रमीख भूमिकेमध्ये असणार आहेत.