बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी काळामध्ये स्टारडम पाहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. आज भलेहि ती आपल्यामध्ये नाही पण तिचे चित्रपट आणि चाहत्यांच्या मनामध्ये ती आठवण कायमची अमर राहिली आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करणारी दिव्या भारतीची आज ४९ वी बर्थ एनिवर्सरी आहे.
या प्रसंगी पुन्हा एकदा चाहते आणि फिल्मी मित्रांनी दिव्या भारतीच्या आठवणीमध्ये तिला श्रद्धांजलि दिली. दिव्या भारतीचे निधन ५ एप्रिल १९९३ रोजी झाले होते जे आज देखील एक रहस्य आहे. ९० च्या दशकामध्ये दिव्या भारतीने बॉलीवूडवर कब्जा केला होता. प्रत्येक दिग्दर्शक-निर्माता तिला आपल्या चित्रपटामध्ये घेऊ इच्छित होता. चाहत्यांमध्ये तिची क्रेज खूपच जास्त होती, दिव्या भारतीचे फोटो लोक आपल्या खोलीमध्ये लावत असत.
दिव्याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता, आज देखील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कि ती आपल्यामध्ये नाही. दिव्याच्या मृत्यूनंतर अशा विचित्र घटना घडल्या होत्या ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. अभिनेत्री श्रीदेवीसोबत देखील असेच काही घडले होते.
माहितीनुसार श्रीदेवीच्या अगोदर लाडला चित्रपटासाठी दिव्या भारतीचे काही सीन शूट केले गेले होते. पण यादरम्यान तिचे निधन झाले. दिव्याच्या ठिकाणी चित्रपटामध्ये श्रीदेवीला कास्ट केले गेले आणि नंतर शुटींग सुरु झाली. सेट उपस्थित असलेल्या लोकांनी श्रीदेवीला सांगितले कि तो त्याच डायलॉगवर अडकत आहे जिथे दिव्या भारती अडकत होती. अनेक प्रयत्न करून देखील जेव्हा श्रीदेवी सीन शूट करू शकली नाही तेव्हा सेटवर गायत्री मंत्राचा जाप करण्यात आला होता.
गायत्री मंत्राच्या जापनंतर चित्रपटाची शुटींग पुढे गेली आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर लाडला हिट झाला. इतकेच नाही तर दिव्याच्या आईने देखील खुलासा केला होता कि मृत्यूनंतर तिची मुलगी स्वप्नामध्ये येत होती, लोक तेव्हा सुन्न झाले होते. साजिद नडियाडवालाची दुसरी पत्नी वर्धा खानने सांगितले कि दिव्या भारती तिच्या स्वप्नांमध्ये येत होती. साजिद नडियाडवाला आणि दिव्या भारती गुपचूप लग्न केले होते, पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षानंतरच अभिनेत्रीचे निधन झाले.