बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवालने एक दिवस अगोदर आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनानिमित्त तिने बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये तिच्या काही मित्रांनी देखील भाग घेतला होता. पण तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने अनेक फोटो शेयर केले आहेत आणि सांगिलते आहे कि मी साखरपुडा केला आहे.
दिव्या अग्रवालने आपली एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत फोटो शेयर केले आहेत आणि सांगितले आहे कि तिला तिचा जोडीदार मिळाला आहे. तिच्या जोडीदाराचे नाव अपूर्व पाडगावकर आहे. तो इंजीनियर आणि उद्योजक आहे. तो एका रेस्टॉरंटचा मालक आहे आणि स्वतः एक डॉग लवर आहे.
दिव्या अग्रवालला तिच्या ३० व्या वाढदिवशी अपूर्व पाडगावकरने अंगठी घालून प्रपोज केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याचे काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये ती आपल्या लाईफ पार्टनरसोबत मिठी मारताना दिसत आहे.
दिव्या अग्रवाल अंगठी दाखवताना खूपच खुश दिसत आहे. तिने या फोटोंसोबत आपल्या एंगेजमेंटबाबतचे अधिकृत वक्तव्य कॅप्शनमध्ये शेयर केले आहे. तिने लिहिले आहे कि मी कधी हसणे थांबवू शकेन का? कदाचित नाही. आयुष्य उजळून निघाले आणि मला हा प्रवास शेअर करण्यासाठी योग्य व्यक्ती मिळाली.”
दिव्या अग्रवालने पुढे लिहिले आहे कि त्याचा ‘हॅशटॅग बिको’ कायमचा वचन देतो. या खास दिवसापासून, मी कधीही एकटी चालणार नाही..” इंडस्ट्रीतील तिचे मित्रही दिव्या अग्रवालचे बिको मिळाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram