अभिनेत्री दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून मॉडेल अलेक्झांडर एलेक्स इलीसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दोघे नेहमी लंच आणि डिनर डेटवर स्पॉट होतात. टायगरसोबत ब्रेकअपची बातमी समोर येताच दिशा आणि अलेक्झांडर एकत्र पार्टीमध्ये स्पॉट होऊ लागले. नुकतेच दोघे कार्तिक आर्यनच्या बर्थडे पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. आता अलेक्झांडरने दिशासोबतच्या अफवांवर मौन सोडले असून टायगरसोबतच्या अभिनेत्रीच्या ब्रेकअपबद्दलही बोलले आहे.
अलेक्झांडर दिशा बद्दल बोलताना म्हणाला कि दोघे खूपच खास मित्र हेत आणि त्यांची मैत्री खूप जुनी आहे. इतकेच नाही तर २०१५ मध्ये तो दिशासोबत एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते. दिशाची एलेक्ससोबत पहिली भेट त्यादरम्यान झाली होती जेव्हा दोघे एकाच एजन्सीसाठी काम करत होते आणि फिटनेसवर दोघांचे एकसारखे विचार असल्यामुळे दोघांची लगेच मैत्री झाली होती.
दिशा पटानीचे महत्व सांगताना एलेक्स म्हणाला कि दिशा त्याच्यासाठी एक कुटुंबासारखी आहे आणि जेव्हा देखील दोघे वाईट काळामध्ये असतात तेव्हा ते एकमेकांची साथ देतात. त्याने म्हंटले कि, मी पाहत आहे दिशा आणि माझ्या रिलेशनबद्दल गेल्या काही दिवसांपासून अफवा येत आहेत.
पण हे कितपत सत्य आहे हे आम्हालाच माहिती आहे. मला समजत नाही कि लोकांना हे जाणून घेण्याची गरज काय आहे कि दोघांमध्ये काय चालू आहे. ते दुसऱ्यांना त्यांचा मनाप्रमाणे जगण्यासाठी का सोडत नाहत. आम्हाला या गोष्टीवर हसू येते.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअपबद्दल बोलताना एलेक्सने टाळाटाळ केली आणि म्हणाला, “कोणाच्याही नात्यावर बोलणारा मी कोण आहे? मात्र, मी दोघांचा चांगला मित्र आहे आणि हो, आम्ही अनेकदा एकत्र वेळ घालवतो.”
View this post on Instagram