HomeBollywoodबॉलीवूडमध्ये शोककळा ! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अंतिम...

बॉलीवूडमध्ये शोककळा ! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास…

बॉलीवूड जगतामधून एक दुखद बातमी समोर आली आहे. प्रसिध्द दिग्दर्शक इस्माइल श्रॉफ आता या जगामध्ये राहिले नाहीत. ६२ व्या वर्षी मुंबईमध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हि बातमी समोर येताच बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक फिल्मी कलाकार आणि चाहते त्यांना श्रद्धांजलि देत आहेत.

माहितीनुसार ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचा मृत्यू झाला. इस्माइल यांना सुरुवातीपासूनच चित्रपटांची आवड होती. आपल्या करियरदरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे निर्देशन केले पण त्यांना खरी ओळख ८० च्या दशकामध्ये थोड़ी सी बेवफाई चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटाचे लेखक त्यांचे भाऊ मोइनुद्दीन होते. याशिवाय त्यांनी आहिस्ता आहिस्ता, अगर, बुलंदी, सूर्या, गॉड एंड गन, पुलिस पब्लिक, निश्चय, दिल… आखिर दिल है, झूठा सच, लव्ह ८६, जिद, थोड़ा तुम बदलो थोड़ा हम सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

इस्माइल श्रॉफला गेल्या २९ ऑगस्टला ब्रेन स्ट्रोक आला होता. ज्यामुळे त्यांच्या शरीराचा उजवा भाग पूर्णपणे लकवाग्रस्त झाला होता. त्यांना चालायला फिरायला येत नव्हते. गेल्या अनेक दिवसांमध्ये ते मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरु होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला होता.

तथापि बुधवारी ६.४० वाजता ते अचानक बेशुद्ध झाले आणि ज्यानंतर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. शेवटी मल्टीपल ऑर्गन फेलियरमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या करियरमध्ये त्यांनी अनेक मोठ्या फिल्मी कलाकारांसोबत काम केले. यामध्ये राजकुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफपासून ते सलमान खान असे अनेक दिग्गज कलाकार सामील आहेत.

फिल्मी जगतामध्ये येण्यापूर्वी ते इंजीनियरिंगचे स्टूडेंट होते. त्यांनी तिरुचिरापल्ली येथून साउंड इंजीनियरिंग केली होती पण नंतर ते चित्रपटांमध्ये करियर बनवण्यासाठी मुंबईला आले होते. इथे सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि नंतर थोडी सी बेवफाई या पहिल्याच चित्रपटाद्वारे ते दर्शकांमध्ये छाप पाडण्यात यशस्वी झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts