टीव्हीवरील सर्वात जास्त पसंद केली जाणारी अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम टीव्ही जगतातील सर्वात चर्चित कपल आहे. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली आहेत. अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने काही मिनिटांपूर्वी चाहत्यांना एक गुड न्यूज देत दीपिका कक्कर प्रेग्नंट असल्याची घोषणा केली आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर दीपिका आई होणार आहे. दीपिका आणि शोएबचे मित्र, कुटुंब आणि करोडो चाहते या जोडीच्या गुड न्यूजची आतुरतेने वाट पाहत होते, कारण हि बातमी अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये होती.
दीपिकाने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये एक क्युट फोटो शेयर केला आहे आणि यासोबत एक कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने स्वतःचा आणि शोएबचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दोघे कॅमेऱ्याकडे पाठ करत पोज देत आहेत. दोघांनी टोपी घातली आहे ज्यावर मॉम-डॅड असे लिहिले आहे.
यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, आभार, आनंद, उत्साह आणि त्याचबरोबर भीतीने भरलेल्या हृदयासोबत एक बातमी तुमच्यासोबत शेयर करत आहे, आमच्या लाईफमधील हा सर्वात सुंदर क्षण आहे. येस आम्ही पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहोत, लवकरच पेरेंटहुड स्वीकारणार आहोत #alhamdulillah. आमच्या बाळाला तुमच्या सर्व प्रार्थना आणि प्रेमाची गरज आहे.
दीपिका तिचा पती शोएब इब्राहिम आणि त्याची बहिण सबा इब्राहिम आपल्या युट्युब चॅनेलवर वेगवेगळे व्हीलॉग चालवतात आणि आपल्या चाहत्यांना लाईफमधील आकर्षक झलक शेयर करतात. अशाच प्रकारे जसे त्यांनी लाईफमधील या क्षणांना शेयर केले तसे ते ईगल-आइड नेटिज़न्स डॉट्समध्ये सामील झाले आहेत आणि असा अंदाज लावला जात आहे कि दीपिका प्रेग्नंट आहे.
दीपिका आणि शोएब ससुराल सिमर का च्या सेटवर सर्वात पहिला भेटले होते. नंत त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २२ फेब्रुवारी २०१८ रोजी लग्न केले होते. असो आता त्यांच्या लाईफमध्ये नवीन सदस्य येण्याची पुष्टी झाली आहे. चाहते त्यांना पोस्टवर भरभरून शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram