मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन चित्रपट अशी ही बनवा बनवी १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटामधील प्रत्येक भूमिका आज दर्शकांच्या तोंडपाठ झाल्या आहेत. अजून देखील या चित्रपटाची क्रेज काही कमी झालेली नाही. अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकांनी दर्शकांच्या मनावर छाप उमटवली होती. चित्रपटामधून अजून एक पात्र लोकप्रिय झाले होते ते म्हणजे शंतनू माने.
शंतनू मानेची भूमिका अभिनेता सिद्धार्थ रेने केली होती. सिद्धार्थ रेने १९७७ मध्ये आपल्या फिल्मी करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यानंतर त्याने १९८० मध्ये थोडीशी बेवफाई चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. चित्रपटामध्ये पद्मिनी कोल्हापुरे त्याच्यासोबत दिसली होती.
त्यानंतर पनाह, तिलक, गंगा का वचन सारख्या चित्रपटामध्ये देखील त्याने काम केले. पण बाजीगर चित्रपटामधील त्याच्या भूमिकेमुळे त्याला जास्त लोकप्रियता मिळाली. अभिनेता सिद्धार्थ या जगामध्ये नाही. त्याने शांतीप्रियसोबत लग्न केले होते.
सिद्धार्थ प्रमाणेच त्याची बायको देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अक्षय कुमारच्या सौगंध चित्रपटामध्ये शांतीप्रिया पाहायला मिळाली होती. हिंदी चित्रपटांबरोबरच तिने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. शांतिप्रिया माता की चौकी-कलयुग में भक्ती की शक्ती आणि द्वारकादिश भगवान श्रीकृष्णा यांसारख्या सिरियल्समध्ये देखील काम करताना दिसली आहे.
लग्नाच्या अवघ्या ५ व्या वर्षी ८ मार्च २००४ मध्ये सिद्धार्थचा अचानक मृत्यू झाला. त्यांना दोन मुले देखील आहेत ज्यांची नावे शुभम आणि शिष्या अशी आहेत. सध्या शांतिप्रिया मुलांसोबत एकटीच राहते. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शांतिप्रियाने चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले. पण आता ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा सक्रीय झाली आहे. तिने हिंदी सिरियल्समध्ये काम करायला सुरुवात केली आहे.