HomeCricketआयपीएलच्या अगोदर धोनीने केली चौकार-षटकारांची आतिषबाजी, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ व्हायरल...

आयपीएलच्या अगोदर धोनीने केली चौकार-षटकारांची आतिषबाजी, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ व्हायरल…

३१ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा १६ वा सीजन म्हणजेच आयपीएल २०२३ ची सुरुवात होणार आहे. सीजनचा पहिला सामना गतविजेता गुजरात टाइटंस आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान खेळवला जाणार आहे. अशामध्ये चेन्नई सुपर किंग्सने आगामी सीजनसाठी तयारी सुरु केली आहे.

यासाठी संघामधील बहुतेक खेळाडू सध्या चेन्नईमध्ये सुरु असलेल्या ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी होऊन मेहनत घेत आहेत. यादरम्यान सर्वांच्या नजरा प्रॅक्टिसच्या वेळी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीवर टिकून राहिल्या, ज्याने नेट प्रॅक्टिसमध्ये चौकार आणि षटकार मारले. नेटमध्ये धोनीचे षटकार पाहून चाहते खुश दिसत होते. चेन्नई सुपर किंग्सचा संघ जेव्हा देखील चेपॉकमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पोहोचतो तेव्हा थाला महेंद्र सिंह धोनीची एक झलक मिळवण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर एकच गर्दी होते. चाहते याची आतुरतेने वाट पाहतात.

याशिवाय अनेक चाहते तर स्टेडियमच्या आतमध्ये टीमचा प्रॅक्टिस सेशन पाहण्यासाठी देखील येतात. शनिवार चेन्नई सुपर किंग्सची टीम जेव्हा स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करत होती तेव्हा धोनीने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. धोनीने आक्रामक शॉट खेळण्याची प्रॅक्टिस करताना काही चेंडू स्टेडियमच्या बाहेर धाडले. सोशल मिडियावर याचा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.

महेंद्र सिंह धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएल २०२३ हा त्याचा शेवटचा हंगाम असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. धोनीने आधी स्पष्ट केले आहे कि आयपीएलमधील शेवटचा सामना त्याला चेन्नईच्या चाहत्यांसमोर खेळायचा आहे. अशामध्ये असा अंदाज लावला जात आहे कि या सीजननंतर तो आयपीएललाही अलविदा करेल. तथापि धोनीकडून याबद्दल अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts