टीवी वरील ‘गोपी बहु’ देवोलीना ने गुपचूप विवाह केला आहे. १४ डिसेंबर ला देवोलीना ने जीम ट्रेनर शाहनवाज सोबत लग्न करून तिच्या नवीन जीवनाची सुरुवात केली आहे. लग्नाचे फोटो शेअर करत देवोलीना ने चाहत्यांना त्यांच्या लग्नाची गुपित लग्नाची माहिती दिली आहे आणि तिच्या पतीची देखील ओळख करून दिली. परंतु आंतरजातीय विवाह केल्या नंतर अनेक लोक देवोलीना ला ट्रोल करताना दिसत आहेत, ज्याचे तिने आता उत्तर दिले आहे.
देवोलीना जिम ट्रेनर शाहनवाज ला मागील २ वर्षांपासून डेट करत होती. अनेक दिवसांच्या पासून असलेल्या या नातेसंबंधा नंतर देवोलीना आणि शाहनवाज ने गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. परंतु शाहनवाज च्या मुसलमान असल्यामुळे अनेक लोक तिला ट्रोल करत आहेत. एका युजर ने देवोलीनाची चेष्टा करताना विचारले होते कि तिचे बाळ हिंदू असेल का मुसलमान? युजर ने तर त्याचे हे ट्विट काढून टाकले, परंतु देवोलीना ने द्वेष करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अभिनेत्रीने तिच्या उत्तरामध्ये लिहिले कि – माझी मुले हिंदू असो वा मुसलमान तुम्ही कोण? तुम्हाला जर एवढेच मुलांची काळजी असेल तर, खूप सारे अनाथ आश्रम आहेत, जावून एडोपट करा आणि तुमच्या मनासारखे धर्म आणि नाव निवडा. माझा नवरा, माझी मुले, माझा धर्म, माझे नियम, तुम्ही कोण?
देवोलीना ने तिच्या दुसऱ्या एका ट्विट मध्ये लिहिले कि – माझ्या आणि माझ्या नवऱ्यावर सोडून द्या. आम्ही बघून घेवू आणि दुसऱ्यांच्या धर्मावर गुगल सर्च करण्यापेक्षा स्वतः च्या धर्मावर लक्ष द्या आणि चांगले व्यक्ती बना. एवढा तर मला विश्वास आहे कि तुमच्या सारख्या लोकांच्या कडून मला ज्ञान घेण्याची गरज नाही.
देवोलीना बद्दल बोलाल तर ती तिच्या लग्नामुळे खूपच खुश आहे. तिने तिचे लग्नाचे फोटो शेअर करताना लिहिले होते कि जर दिवा घेवून देखील शोधला असता तरी देखील मला असला पती मिळाला नसता. देवोलीना आणि शाहनवाज यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मिडीयावर अजून पर्यंत वायरल होत आहेत. अभिनेत्रीला चाहते आणि सेलिब्रिटींनी खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत, परंतु काही लोक इंटरकास्ट लग्न करण्यावर त्यादोघांना ट्रोल करत आहेत. असो, आम्ही तर देवोलीना ला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत.