HomeBollywood“आमची चमत्कारी मुलगी...” म्हणत देबिनाने दाखवली तिच्या नवजात मुलीची पहिली झलक, इनक्यूबेटरमध्ये...

“आमची चमत्कारी मुलगी…” म्हणत देबिनाने दाखवली तिच्या नवजात मुलीची पहिली झलक, इनक्यूबेटरमध्ये झोपलेल्या मुलीची काळजी घेताना दिसला गुरमीत…

साल २०२२ टीवी जोडपे देबिना बनर्जी आणि गुरमीत चौधरी यांच्यासाठी खूप साऱ्या आनंदी गोष्टी घेऊन आले आहे. जोडप्याने वर्षाच्या सुरुवातीला एका गोंडस बाळ लियाना चे स्वागत केले. देबिना लग्नाच्या ११ वर्षा नंतर आई बनलेली आहे. तसेच मुलगी लियाना च्या जन्माच्या १ महिन्यानंतर त्यांना तिच्या दुसऱ्या गर्भधारणे बद्दल समजले ज्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ११ नोव्हेंबर २०२२ ला त्यांच्या घरी आणखी एका बाळाचा आवाज येवू लागला.

देबिना ने आणखी एका एका गोंडस बाळाला जन्म दिला. तथापि अभिनेत्रीच्या या मुलीचा वेळेच्या आधीच जन्म झाला म्हणजेच त्यांची ही लहान मुलगी प्रीमेचुअर आहे. देबिना ने डिलिव्हरी तारखेच्या आधीच तिच्या मुलीला जन्म दिला होता त्यामुळे बाळ खूपच अशक्त आहे आणि तिला आणखी काही दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागले. आता अभिनेत्रीची मुलगी एकदम ठीक आहे. देबिना ने तिच्या लाडक्या लहान मुलीची एक लहानशी झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. देबिना ने हॉस्पिटल च्या खोली मधील तिच्या प्रीमेचुअर बाळाचा पहिला विडीओ शेअर केला आहे.

विडीओ मध्ये तुम्ही त्यांच्या लहान बाळाला हॉस्पिटल च्या खोलीमध्ये पाहू शकता. गुरमीत चौधरी मेडिकल फॉर्मेलिटीज पूर्ण करताना दिसत आहे. डॉक्टर च्या द्वारे या जोडप्याच्या लाडक्या बाळावर प्रीमेचुअर बेबी च्या आधारावर उपचार केले जात आहेत.

एवढेच नाही तर गुरमित त्याच्या लाडक्या बाळाला प्रेमाने गोंजारताना दिसत आहे. या विडीओ सोबत देबिना ने लिहिले आहे की ‘ आमच्या चमत्कारीत बाळाला या जगात येण्याची खूप घाई होती. दयाळू पणा दाखवल्या बद्दल धन्यवाद, तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आमच्या साठी महत्वाचे होते, ती आता ठीक होत आहे. डॉक्टर तिच्यासाठी जे काही करत आहेत, मी त्यासाठी त्या सर्वांचे पुरेसे आभार मानू शकत नाही. वडील, गुरमित आणि मम्मी माझ्या जवळ आहेत. मी फक्त या चमत्कारीत बाळाला घरी घेऊन जाण्याची वाट बघत आहे.

देबिना ने बाळाच्या येण्याची एक गोंडस अनाउन्समेंट पोस्ट केली होती. तिने तिचा पती गुरमीत सोबत गुलाबी फुग्यांचा गुच्छ पकडून एक मैटरनिटी फोटो शूट चे फोटो शेअर केले होते. फोटो मध्ये तिने वर लिहिले होते- ‘ती एक मुलगी आहे. तिने लिहिले होते-‘या जगात आमच्या बाळाचे स्वागत आहे. आम्ही परत एकदा आई बाबा बनलो आहे, आम्हाला यावेळी थोडा एकांत हवा आहे, कारण की आमचे बाळ वेळेच्या आधीच या जगात आलेले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच राहू दे.

गुरमीत चौधरी आणि देबिना बनर्जी ने या वर्षी ३ एप्रिल ला लियाना चे स्वागत केले आहे. लियाना साठी गुरमीत आणि देबिना ने खूप प्रार्थना केली आणि शेवटी त्यांनी आईवीएफ चा पर्याय निवडला.तसेच लियाना च्या जन्माच्या चार महिन्या नंतर त्यांना मोठे आश्चर्य मिळाले कारण की देबिना ने नैसर्गिक रित्या कंसीव केले आहे अशातच जोडप्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. आता हे जोडपे दोन गोंडस मुलींचे पालक आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts