टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) ने नुकतेच तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटतानाचा तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या मुलीसाठी एक सुंदर नोट लिहिली आहे.
देबिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या गोड मुलीचा एक फोटो शेयर केला आहे. फोटोमध्ये ती आपल्या गोड मुलीला न्याहाळताना दिसत आहे. तथापि तिने मुलीचा चेहरा हार्टच्या इमोजीने लपवला आहे. या पोस्टवर तिने कॅप्शनमध्ये एम्मा रॉबिन्सनची एक कविता लिहिली आहे.
तिने लिहिले आहे कि माझ्या दुसऱ्या मुलीसाठी, तू माझी पहिली मुलगी नाहीस हे सत्य आहे, तुझ्यावर प्रेम करण्यापूर्वी मी दुसऱ्यावर प्रेम केले आहे, पण यावेळी मी एक वेगळी आई आहे. पहिल्यापेक्षा आणखी शांत आणि आत्मविश्वासाने भरलेली. जेव्हा तू आलीस तेव्हापासूनच एक नवीन अध्याय सुरु झाला आहे.
आता दोन मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी पहिल्यांदा खूप उत्साही होतो. पण या वेळी मला सर्वकाही हळू हवे आहे. तुझे पहिले माझ्यासाठी शेवटचे असेल. शेवटचे गुडघ्यावर चालणे आणि सवारी करणे. तू माझी पहिली मुलगी नाहीस हे भलेहि सत्य आहे पण माझी शेवटची मुलगी तूच राहशील.
देबिना नुकतेच आपल्या प्रसूतीनंतरच्या प्रवासाविषयी मोकळेपणाने बोलली आहे. तिने सांगितले होते कि प्रेग्नंसी दरम्यान तिला कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला. तिने आपल्या प्रसूतीनंतरच्या पोटाची झलक शेयर करत लिहिले आहे कि ज्या गोष्टी तुम्हाला आतून मारत नाहीत त्या तुम्हाला मजबूत बनवतात. गेले काही महिने प्रयत्न, सल्ला आणि फिजिकल लिमिटेशनने भरले होते.
टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांनी यावर्षी ३ एप्रिल रोजी पहिल्या मुलीचे स्वागत केले होते. त्यानंतर महिन्याभरामध्येच देबिना पुन्हा प्रेग्नंट राहिली. तर दोघे लव्ह बर्ड २०११ मध्ये १५ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनामध्ये अडकले होते. यानंतर त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा लग्न केले.
View this post on Instagram